अंगाला आपोआपच गुलाबाचा गंध आणणारे संयुग!

अमेरिकी संशोधकांनी शोधून काढले एक वेगळे डिओडरंट
American researchers have discovered a different deodorant
अमेरिकी संशोधकांनी एक वेगळे डिओडरंट शोधून काढले आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : सध्या आपण टीव्हीवर अनेक डिओडरंटच्या जाहिराती पाहतो, पण त्यातील घटकांचा विचार केला तर शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात, त्यातील घामाला रोखणारे डिओडरंट तर नैसर्गिक प्रक्रियेच्या विरुद्ध काम करीत असतात. अशातच आता अमेरिकी संशोधकांनी एक वेगळे डिओडरंट शोधून काढले आहे ते अंगावर फवारावे लागत नाही तर औषधासारखे सेवन करता येते व नंतर काही तासांनी तुमच्या अंगाला गोड सुगंध येऊ लागतो. तो गुलाबासारखा असतो शब्दश: अर्थाने बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यावर भर देणारे हे डिओडरंट आहे.

डिओ परफ्यूम कँडी या कंपनीने तयार केले हे डिओडरंट

डिओ परफ्यूम कँडी या कंपनीने हे डिओडरंट तयार केले आहे. ते सेवन केल्यानंतर काही तासातच तुमच्या शरीरात गुलाबाचा वास त्वचारंध्रातून बाहेर पडतो. त्याचे स्वरूप टँगरिनची चव दिलेली कँडी स्वरूपातील मिठाई असे आहे. ते सेवन केल्यानंतर पुढचे सहा तास तुमच्या शरीरातून गुलाबाचा सुगंध येतो व त्यामुळे घामाचा दुर्गंध जाणवतही नाही. गुलाबाचा सुगंध देणारा असा कुठला घटक त्यात आहे याच विचार केला तर त्यात गेरानिऑल हे संयुग आहे, ते गुलाब, लॅव्हेंडर व व्हॅनिला या वनस्पतीत असते. सध्याचे कुठलेही डिओडरंट पोटात सेवन केले जात नाही, हे डिओडरंट सेवन करता येते. गुलाब, लॅव्हेंडर व व्हॅनिला यातील गेरानिऑल हे संयुग यात असते. त्यामुळे सहा तास तुमच्या शरीरातून गुलाबाचा वास दरवळतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news