wendy levra : पतीच्या टोमण्यांमुळे बनली बॉडीबिल्डर | पुढारी

wendy levra : पतीच्या टोमण्यांमुळे बनली बॉडीबिल्डर

कॅलिफोर्निया : फिटनेसच्या बाबतीत अमेरिकेची 42 वर्षीय वेंडी लेवरा ही महिला सध्या तरुण मुलींवरही मात करू शकते. ती बॉडीबिल्डर होण्यास तिच्या पतीचे उपहासात्मक बोलणे जबाबदार असल्याचे म्हटले जाते. वेंडी सध्या एक व्यावसायिक बॉडीबिल्डर आहे. पतीला घटस्फोट देऊन ती सध्या आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या बॉयफ्रेंडबरोबर राहते.

मिरर युकेने दिलेल्या माहितीनुसार वेंडी लेवरा सध्या नेवाडा येथे राहत आहे. वेंडीचे 15 इंचाचे बाईसेप्स, सुडौल बॉडी, मजबूत मसल्स पाहून प्रत्येकजण आश्‍चर्यचकीत झाल्याशिवाय राहात नाही. वेंडीने एकदा आपल्या पतीसमोर जीमला जाण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्यावेळी पतीने दिला उपहासात्मक बोल सुनावले. हे बोल कायम ऐकावे लागत असल्याने वेंडीने शेवटी पतीला घटस्फोट दिला. वयाच्या 35 व्या वर्षी ती जीमला जॉईन झाली.

नियमित जीममध्ये जाऊन कठोर परिश्रमाच्या बळावर वेंडीने आपले शरीर असे बनविले की, त्यामुळे ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊ शकली. बॉडीबिल्डिंगमध्ये वेंडीने अनेक अ‍ॅवॉर्ड जिंकले आहेत. तिने पर्सनल ट्रेनर आणि बॉडीबिल्डिंगमध्ये पुढे जाण्यासाठी विमा कंपनीतील नोकरीही सोडली. याशिवाय सतत टोमणे मारणार्‍या पतीला घटस्फोट दिला. काही वर्षांनी तिला आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेला सीन ओ ऑफलेटरीची सोबत मिळाली. सध्या ते दोघे एकत्र राहतात. तसेच सीन हा आपला बॉयफ्रेंड असल्याचे वेंडी सांगते.

Back to top button