नॉर्वे : ‘या’ ठिकाणी असते केवळ 40 मिनिटांची रात्र | पुढारी

नॉर्वे : ‘या’ ठिकाणी असते केवळ 40 मिनिटांची रात्र

लंडन : नॉर्वे हा युरोप खंडातील उत्तरेकडील देश आहे. उत्तर ध्रुव म्हणजेच आर्क्टिकच्या वर्तुळातील देश असल्याने तिथे अतिशय थंडी असते व ध्रुवीय प्रदेशांमधील अनेक वैशिष्ट्यपूर्ण नजारे तिथे पाहायला मिळत असतात. नॉर्वे हा असा देश आहे जिथे उन्हाळ्यात कधी सूर्यास्त होत नाही असे म्हटले जाते. याठिकाणी केवळ 40 मिनिटांची रात्र असते आणि अन्य काळात सूर्य पाहायला मिळत असतो.

याठिकाणी रात्री 12 वाजून 43 मिनिटांनी सूर्यास्त होतो व अवघ्या 40 मिनिटांमध्येच पुन्हा सूर्योदय होतो. रात्री दीड वाजताच तिथे पहाट फुलते! हा क्रम एक-दोन दिवस नव्हे तर अडीच महिने सुरू असतो. त्यामुळेच नॉर्वेला ‘कंट्री ऑफ मिडनाईट सन’ असेही म्हटले जाते.

याठिकाणी मे ते जुलैदरम्यान 76 दिवस सूर्यास्त होत नाही. असेच द‍ृश्य हेमरफेस्ट शहरातही पाहायला मिळते. नॉर्वेमध्येच एक ठिकाण असेही आहे जिथे गेल्या शंभर वर्षांच्या काळात सूर्यकिरणे पोहोचलेली नाहीत. याचे कारण म्हणजे हे ठिकाण चारही बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेले आहे.

Back to top button