जकार्ता : काही प्रमाणात सरड्यासारखा दिसणारा हा प्राणी पाहून ही सरड्याची मोठी प्रजाती असेल, असेच काहीसे वाटू शकते. सरडा तसा निरुपद्रवी असल्याने या प्राण्यापासूनही धोका नसेल, अशीही समजूत होऊ शकते. पण, वस्तुस्थिती अगदी उलट असून हा प्राणी धोकादायक आहे आणि सापाप्रमाणेच विषारीही आहे. याला कोमोडो ड्रॅगन Komodo Dragon या नावाने ओळखले जाते.
कोमोडो ड्रॅगन प्रामुख्याने इंडोनेशियामध्ये आढळून येतात. त्यांचे नाव फक्त नावासाठी ड्रॅगन आहे. याचे कारण असे की, त्यांच्यामध्ये ड्रॅगनसारखे गुण नाहीत. तरीही ते जगातील सर्वात मोठी सरडे प्रजाती आहेत. 3 मीटर लांब आणि सुमारे 70 किलो वजनाचे हे शिकारी प्राणी अतिशय धोकादायक मानले जातात. अनकेदा या प्राण्याने मनुष्यावरही हल्ले चढवले आहेत.
कोमोडो ड्रॅगन हे प्राणी इंडोनेशियाच्या इतर बेटांवर राहात असले तरी ते मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत, असा जाणकारांचा होरा आहे. जीवाश्म रेकॉर्ड दर्शविते की, कोमोडो ड्रॅगन हे मूळचे उत्तर-पूर्व ऑस्ट्रेलियाचे होते आणि हिमयुगात ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले. नंतर 50 हजार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातून पूर्णपणे गायब झाले. कोमोडो ड्रॅगन हे मोठे सरडे आहेत आणि डुक्कर, हरिण, म्हैस इत्यादींसह त्यांच्या स्वतःच्या आकारापेक्षा मोठे प्राणी खाऊ शकतात. ते त्यांच्या वजनाच्या 80 टक्के शिकार एकाच वे ळी खातात. एकदा शिकार केल्यावर ते न खाता महिनाभर जगू शकतात, हे देखील त्यांचे अनोखे वैशिष्ट्य आहे.
हेही वाचा :