अमेरिकेतील फ्लाईंग कार मध्ये भारतीयाचे योगदान | पुढारी

अमेरिकेतील फ्लाईंग कार मध्ये भारतीयाचे योगदान

वॉशिंग्टन : जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या ‘फ्लाईंग कार’ म्हणजेच ‘उडत्या मोटारी’ बनत आहेत. अमेरिकेतही अशी कार बनत असून ‘लुफ्टकार’ कंपनीकडून तिची निर्मिती सुरू आहे. अमेरिकेतील या कंपनीचे सीईओ संत सत्य हे मूळचे भारतीय असून त्यांनी चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहे.

2023 पर्यंत अशा उडत्या मोटारी बाजारात येण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्या अशा मोटारींच्या कन्सेप्टवर काम करीत आहेत. त्यामध्येच ‘लुफ्टकार’चाही समावेश आहे. कंपनीच्या या कारमध्ये सहा प्रोपेलर असतील.

या फ्लाईंग कार कारचा वेग हा ताशी 350 किलोमीटर असेल. ही कार जमिनीवरही धावेल आणि आकाशातही उड्डाण करील. जमिनीपासून चार हजार फूट उंचीवरून उडण्याची क्षमता या कारमध्ये आहे. ही कार हायड्रोजन इंधनावर चालणार असून त्यामध्ये पाच लोकांच्या बसण्याची व्यवस्था असेल.

अमेरिकेतील या कारची किंमत सुमारे 26 लाख रुपये असेल असे म्हटले जाते. कंपनीचे सीईओ संत सत्य यांनी सांगितले की गर्दी, वाहतुकीची कोंडी असलेल्या शहरांमध्ये या कारचा वापर सोयीचा ठरेल. मात्र, या कारमधून लांब पल्ल्याचा प्रवास करता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button