वन्य प्राण्यांना मानवाकडून मिळणारा आहार हानिकारकच? | पुढारी

वन्य प्राण्यांना मानवाकडून मिळणारा आहार हानिकारकच?

न्यूयॉर्क : एका नव्या संशोधनात असे दिसून आले ओ की वाढत्या वयात पकडलेल्या वन्य प्राण्यांना दिल्या जाणार्‍या मऊ आहारामुळे त्यांची कवटी जंगलात वाढणार्‍या प्राण्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विकसित होऊ शकते. वन्य प्राण्यांना मानवाकडून दिला जाणारा आहार त्यांच्या कवटीच्या विकासात अडथळा आणू शकतो.

कृत्रिमरीत्या प्राण्यांची काळजी घेतली जात असताना अनेकवेळा त्यांचा नैसर्गिक आहार त्यांना दिला जात नाही. पाळीव किंवा वाचवलेल्या प्राण्यांचा आहार त्यांच्या सामान्य आहारापेक्षा वेगळा असतो.

अनेक वेळा त्यांना प्रक्रिया केलेले, तयार केलेले मांस, फळे व अन्य प्रकारचे प्री-प्रोटिन अन्न दिले जाते. असे अन्न किशोरवयीन प्राण्यांच्या वाढीसाठी अडथळाच ठरू शकते. विशेषतः मऊ आहारामुळे वाढत्या वयाच्या प्राण्यांची कवटी योग्यप्रकारे विकसित होत नाही.

गेल्या काही दशकांमध्ये पकडलेल्या सिंह, माकडे व अन्य काही प्राण्यांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. फिलँडर्स युनिव्हर्सिटीचे संशोधक डी रेक्स मिशेल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे संशोधन केले आहे. ‘इंटिग्रेटिव्ह ऑर्गेनिजमल बायोलॉजी’ या नियतकालिकात त्याची माहिती देण्यात आली.

 

Back to top button