Expensive horse!: तब्बल अडीच कोटी रुपयांचा घोडा! | पुढारी

Expensive horse!: तब्बल अडीच कोटी रुपयांचा घोडा!

जयपूर ः

हा आहे तब्बल अडीच कोटी रुपयांचा ‘हिरा’ नावाचा घोडा. त्याचा आहार आणि दर महिन्याला त्याच्यावर होणारा खर्च पाहून आपले डोळे विस्फारू शकतात. हा घोडा एकावेळी 50 लिटर दूध गट्टम करतो. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये सध्या सुरू असलेल्या घोड्यांच्या बाजारात सध्या या घोड्याची सर्वाधिक चर्चा आहे.

हा घोडा पदमपूरच्या इकबाल सिंह यांचा आहे. ते गेल्या नऊ वर्षांपासून त्याची देखरेख करीत आहेत. त्यांनी सांगितले की या मेळ्यात आलेल्या सर्व घोड्यांच्या तुलनेत हिराची उंची अधिक आहे. सर्वसाधारणपणे घोड्याची उंची 160 सेंटीमीटर असते. मात्र, या घोड्याची उंची 170 सेंटीमीटर इतकी आहे. दर महिन्याला हिराच्या खाण्या-पिण्यावर आणि देखभालीवर दीड लाख रुपयांचा खर्च येतो. त्याला तूपही पाजले जाते आणि आठवड्यातून दोनवेळा दूध पाजले जाते. मारवाडी प्रजातीच्या या घोड्याचे पाय अतिशय मजबूत आहेत. त्याला हरभरा, शेंगदाणे, मोहरी आणि तिळाचे तेल आदी आहारातून दिले जाते. इकबाल हे एका कॉटन फॅक्टरीचे मालक असून त्यांना घोड्यांचा शौक आहे. ते शेतीही करतात आणि त्यांच्याकडे अनेक प्राणी आहेत.

Back to top button