crystals! स्फटिकांचे मोठे स्तंभ! | पुढारी

crystals! स्फटिकांचे मोठे स्तंभ!

मेक्सिको सिटी ः

मेक्सिकोमध्ये ‘जायंट क्रिस्टल केव्ह’ नावाची एक खाण आहे. तेथील अनोखे सेलेनाईट क्रिस्टल (crystals) लोकप्रिय आहेत. चिहुआहुआमध्ये सिएरा डे नाइका पर्वताखाली 984 फूट खोलीवर असे विशाल क्रिस्टल पिलर्स आहेत. या खाणीचा सन 2000 मध्ये दोन बंधूंनी शोध घेतला होता. (crystals)

हे दोघे भाऊ इंडस्ट्रियल पेनोल्ससाठी काम करीत होते. ते नाइका पर्वताखाली एक सुरुंग खोदत असताना अपघातानेच या खाणीचा शोध लागला. हे क्रिस्टल वास्तवात जिप्समपासून बनलेले आहेत. हे एक असे खनिज आहे ज्याचा वापर कागद आणि कापड उद्योगांमध्ये ‘फिलर’ म्हणून केला जातो. तसेच सिमेंट बनवण्यासाठीही हे खनिज वापरले जाते. विशेष म्हणजे याठिकाणी आढळलेले स्फटिकांचे खांब पाच लाख वर्षांपेक्षाही जुने आहेत. त्यापैकी काही खांब इतके मोठे आहेत की त्यावरून आरामात चालताही येते. लाखो वर्षे जमिनीखाली दबलेले हे खांब वाढतच आहेत हे विशेष. याठिकाणी विशेष कुलिंग सूट परिधान केल्याशिवाय जाता येत नाही. 90 ते 99 टक्के आर्द्रतासह गुहेतील तापमान 58 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असते. तिथे नैसर्गिक प्रकाश नसून हवाही आम्लयुक्‍त असते. त्यामुळे ही जागा मनुष्यासाठी तशी धोकादायकच आहे.

Back to top button