सातारा जिल्हा बॅंक : मतदान व मतमोजणी प्रतिनिधींना सूचना | पुढारी

सातारा जिल्हा बॅंक : मतदान व मतमोजणी प्रतिनिधींना सूचना

“सातारा : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवार, दि. 21 रोजी मतदान व दि. 23 रोजी मतमोजणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी मतदान व मतमोजणी प्रतिनिधींची बैठक घेवून आवश्यक त्या सूचना केल्या.

मतदान प्रक्रिया ही सकाळी 8 ते 5 या वेळेत होणार आहे. मतदान प्रतिनिधी यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी केंद्रावर एक तासापूर्वी यावे. त्यामुळे मतदान सुरू होण्यापूर्वीची प्रक्रिया मतदान अधिकार्‍यांसमोर पूर्ण करून घेता येईल. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ओळखपत्राशिवाय मतदाराला मतदान करून दिले जाणार नाही. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त दिला आहे.

मतदान केंद्रावर 100 मीटरचे आत कोणतेही वाहन जाणार नाही. उमेदवार प्रतिनिधी यांनी जास्त वेळ केंद्रावर थांबू नये. कॅमेरा, कॅमेरावाला पेन, मोबाईल इ. गोपनियतेचा भंग होईल अशी काणेतीही उपकरणे केंद्रात आणता येणार नाहीत.
मतदान केंद्रात प्रवेश करतेवेळी उमेदवार, प्रतिनिधी व मतदार यांना मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही तसेच मतमोजणीवेळीही सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मतदान केंद्रात कोणत्याही प्रकारचा फोटो काढण्यास सक्त मनाई असेल

. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेटया स्ट्राँगरूमध्ये ठेवताना व मतमोजणीचे दिवशी बाहेर काढताना उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. या सर्व सूचनांचे अधिकारी, कर्मचारी व उमेदवार प्रतिनिधी यांनी पालन करणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही माळी यांनी दिला आहे.

 

 

 

Back to top button