इस्लामाबाद : प्रेम कधी, कुठे आणि कोणावर होईल याबद्दल आपण कोणीही काही सांगू शकत नाही. प्रेमात वय, रंग, धर्म काही पाहिलं जात नाही. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात. नुकतीच सोशल मीडियावर हटके आणि आश्चर्यकारक लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर या जोडीची चर्चा सुरू आहे. पाकिस्तानमधील ही प्रेमकहाणी जाणून प्रत्येक जण अवाक् झाले आहेत. एका 18 वर्षांच्या तरुणाने 35 वर्षांच्या महिलेशी लग्न केलं आहे. शहजाद असं मुलाचं नाव असून कोमल असं महिलेचं नाव आहे.
या दोघांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहजाद हा शाळेत असताना कोमलच्या प्रेमात पडला होता. शाळेतील आणि त्याच्या वयात होणारं हे आकर्षण असून शकतं असं घरच्यांना वाटलं. घरच्यांनी त्याच्या प्रेमाला विरोध केला. त्या महिलेचा नाद सोडावा म्हणून शहजादला मारहाण करण्यात आली; पण तो त्या महिलेवर खरं प्रेम करतो असं म्हणत तिच्याशी लग्न करण्यावर ठाम होता. त्याच्या भूमिकेसमोर अखेर कुटुंबीयांनी नमतं घेतलं आणि त्यांनी लग्नाला होकार दिला.
आता दोघांचे लग्न झाले आहे. शहजाद आणि कोमलची लव्ह स्टोरी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांचा कमेंटस्चा पाऊस पडतोय. एका यूजरने लिहिलं आहे की, 'मला हा मुलगा 18 नसून 13 वर्षांचा वाटतोय.' आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, 'हे खरे आहे यावर माझा विश्वास बसत नाही.'