फ्लोरिडात उडत्या माशाची अफवा! | पुढारी

फ्लोरिडात उडत्या माशाची अफवा!

वॉशिंग्टन : कधी कधी द़ृष्टिभ्रम होतात आणि भन्नाट अफवाही पसरतात. अगदी अमेरिकेसारख्या देशातही अशा अफवा वेळोवेळी पसरत असतात. तिकडच्या लोकांना एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांच्या अफवा पसरवण्यात अधिक रस आहे असे दिसते. आताही आकाशातून एक विचित्र वस्तू उडत असताना आढळून आल्याचा दावा फ्लोरिडात करण्यात आला आहे. हा एखादा उडता मासा असावा किंवा एलियन्सचे यान म्हणजेच ‘यूफो’ असावे असे अनेकांना वाटत आहे!

हे प्रकरण याच आठवड्यातील असल्याचे सांगितले जात आहे. आकाशात माशासारख्या आकाराचा आणि दोन डोळे असलेला जीव उडत असताना पाहण्यात आल्याचा दावा केला गेला. फ्लोरिडात अनेकांनी याला ‘फ्लाईंग फिश’ असे नाव दिले तर परग्रहवासींच्या अस्तित्वावर ठाम विश्वास असणार्‍या ‘एलियन हंटर्स’मधून हे ‘यूफो’ असल्याचे सांगितले गेले.

एलियन्सनीच या माशाला आकाशात उडवले किंवा खेचून घेतले असा दावाही करण्यात आला. एलियन एक्सपर्ट स्कॉट वरिंग यांनी पाण्याखालीही एलियन्सचा तळ असावा असा दावा केला आहे. अमेरिका व अन्य काही देश अनेक वर्षांपासून परग्रहवासीयांच्या संपर्कात आहेत; पण याबाबतचे सत्य लोकांपासून लपवले जात आहे असा दावाही अनेकांनी केलेला आहे.

Back to top button