वॉशिंग्टन : अमेरिकेत चक्क शाकाहारी चिकनही तयार झाले असून त्याची विक्रीही होत आहे. काही दिवसांपूर्वी परदेशात शाकाहारी 'मासे' तयार झाल्याचे वृत्त आले होते. आता 'बियाँड मीट्स' या कंपनीने हे शाकाहारी चिकन विकण्यास सुरुवात केली आहे. हे चिकन म्हणजे खरोखरच्या कोंबडीचे मांस नसते तर वनस्पतीजन्य असते.
या शाकाहारी चिकनसाठीची 'प्रथिने' ही वाटाणे, मूग, वाल आणि ब—ाऊन राईसपासून मिळवली जातात. 'चरबी' ही कोकोआ बटर, नारळाचे तेल आणि एक्स्पेलर-प्रेसिड कॅनोला ऑईलमधून मिळवले जाते. 'मिनरल्स'साठी कॅल्शियम, लोह, मीठ आणि पोटॅशियम क्लोराईडचा वापर केला जातो.
चव आणि रंगासाठी बीट रसाचा तसेच सफरचंदाच्या अर्काचा वापर होतो. 'कार्बोहायड्रेटस्'साठी कंपनीने बटाटा स्टार्च आणि मिथाईल सेल्युलोजचा वापर केला आहे. अमेरिकेतील 400 रेस्टॉरंटमध्ये हे चिकन विकले जाते. यामध्ये वनस्पतीआधारित मीटबॉल, बर्गर पॅटिस आणि सॉसेजचा समावेश आहे.