मृतदेहाला भविष्यात जिवंत केले जाऊ शकेल? | पुढारी

मृतदेहाला भविष्यात जिवंत केले जाऊ शकेल?

वॉशिंग्टन : अमरत्वाबाबत किंवा मृत्यूनंतर मृतदेहाला पुन्हा जिवंत करण्याबाबत प्राचीन काळापासूनच लोकांमध्ये कुतुहल आहे. आता अमेरिकेतील एका कंपनीने दावा केला आहे की मृत्यूनंतरही माणसाला जिवंत केले जाऊ शकेल. त्यासाठी मृतदेह दीर्घकाळ जतन करून ठेवला जाईल.

अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यातील स्कॉटस्डेलमध्ये असलेल्या एल्कोर फर्मने क्रायोनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून स्वतःला सिद्ध केलेले आहे. या कंपनीने दावा केला आहे की मृतदेहाला भविष्यात जिवंतही केले जाऊ शकेल. त्यासाठी कंपनीने एक योजनाही आखली आहे. कंपनीचा दावा आहे की मृत्यूनंतरही माणसाला सचेतन ठेवण्यासाठी आम्ही एक योजना बनवली आहे.

त्यासाठी दरवर्षीच्या हिशेबाने एक मोठी रक्‍कम चुकवावी लागेल. या तंत्रामध्ये मृत्यूनंतर देहाला फ्रीज केले जाते. कालांतराने शरीर सचेतन केले जाईल. एखाद्याचा मृत्यू झाला आहे असे जाहीर झाल्यानंतर त्याच्या मेंदूत द्रवरूप नायट्रोजन भरून त्याला फ्रीज केले जाते. अशा मृतदेहांना काही विशेष तंत्रज्ञानाने पुन्हा जिवंत केले जाऊ शकेल.

एल्कोर फर्मने एक मृतदेह फ्रीज करण्यासाठी 2 लाख डॉलर्सचे शुल्क ठेवले आहे. भारतीय चलनामध्ये ही रक्‍कम 15 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही रक्‍कम एकाच वेळी द्यावी लागेल. कंपनीचे ब्रिटिश सीईओ मॅक्स मोर यांनी सांगितले की ही प्रक्रिया अनेक लोकांसाठी किफायतशीर आहे. सध्या 184 लोकांचे मृतदेह क्रायोनिक प्रोसेसमध्ये ठेवलेले आहेत.

Back to top button