विमानाचा रंग का असतो पांढरा? | पुढारी

विमानाचा रंग का असतो पांढरा?

नवी दिल्ली : विमानाविषयी आपल्याला लहानपणापासूनच कुतुहल असते. कागदी विमान उडवणारी मुलं कधी खर्‍या विमानात बसतील याची वाट पाहत असतात. विमान पाहिल्यावरही त्याबाबत अनेक प्रश्न उभे राहतात. विमानाचा रंग पांढराच का असतो असे अनेकांना वाटू शकेल. अर्थात अन्यही काही रंगांची विमाने असली तरी बहुतांश प्रवासी विमाने ही पांढर्‍या रंगाची असतात.

विमानाचा रंग पांढरा असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पांढरा रंग विमानाला सूर्याच्या किरणांपासून वाचवतो. पांढरा रंग उष्णतेला परावर्तित करीत असतो. धावपट्टीपासून आकाशपर्यंत विमाने नेहमी उन्हातच असतात. त्यावेळी त्यांच्यावर थेट सूर्यकिरणे पडत असतात. त्यामध्ये अतिनील किरणांचाही समावेश असतो व या सूर्यकिरणांमुळे विमानात तीव्र उष्णता निर्माण होऊ शकते.

पांढर्‍या रंगामुळे विमान गरम होण्यापासून बचाव होतो. पांढरा रंग सूर्याच्या 99 टक्के किरणांना परावर्तित करतो. पांढर्‍या रंगामुळे कोणत्याही प्रकारची भेग किंवा भेगा सहज दिसतात. जर विमानाचा रंग पांढर्‍याऐवजी अन्य रंगांचा असेल तर या भेगा लपल्या जातात. अशा स्थितीत विमानाची देखभाल आणि तपासणीसाठी पांढरा रंग उपयुक्त ठरतो.

विमानाचा पांढरा रंग असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पांढरा रंग विमानाला सूर्याच्या किरणांपासून वाचवतो. पांढरा रंग उष्णतेला परावर्तित करीत असतो. असण्याचे आणखी एक कारण म्हणजे अन्य सर्व रंगांच्या तुलनेत पांढर्‍या रंगाचे वजनही अतिशय कमी असते. पांढर्‍या रंगाने रंगवल्यामुळे विमानाचे वजन वाढत नाही. आकाशात उडण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते.

Back to top button