एलियन्सचा शोध विशाल टेलिस्कोपने लावणार | पुढारी

एलियन्सचा शोध विशाल टेलिस्कोपने लावणार

बीजिंग : एलियन्सवरून सातत्याने संशोधन करण्यात येत आहे. मात्र, एलियन्स खरोखरच एखाद्या ग्रहावर आहेत का? याचे उत्तर आजपर्यंत कोणच ठामपणे देऊ शकलेले नाहीत. मात्र, काही शास्त्रज्ञ व नागरिकांनी एलियन पाहिले असल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्यात किती सत्यता आहे की नाही, याबाबत काहीच सांगता येत नाही. अशा स्थितीत चीनमधून येणारी बातमी सर्वांना आश्चर्यचकीत करू लागली आहे.

चीनमध्ये ‘फास्ट’ नामक एक विशालकाय टेलिस्कोप असून याच्या मदतीने एलियन्सचा शोध लागू शकतो, असे म्हटले जात आहे. सुमारे 500 मीटर इतकी मोठी असलेले हे ‘मेगा टेलिस्कोप’ एलियन्सबाबत माहिती गोळा करण्यास मदत करू शकतो. या टेलिस्कोपचे नाव ‘एपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोप’ असे आहे.

फास्ट या महाकाय टेलिस्कोपच्या मदतीने एलियन्स या अतिआधुनिक किवा पुढारलेल्या संस्कृतीचा शोध लावला जाऊ शकतो, असे जॉर्जियाच्या टिबिल्सीस्थित फ्री युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ डॉ. जाजा ओमानोवा यांनी म्हटले आहे.

जाजा यांच्या संशोधनानुसार चीनची ही दुर्बिण कार्दाशेव सिव्हिलायझेशन पद्धतीच्या मदतीने तसेच थर्मल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इनर्जीच्या सहाय्याने एलियन्सचा शोध लावू शकणार आहे. हे एलियन्स सुमारे 400 दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावर असण्याची शक्यता आहे. हे संशोधन रीदर्ळीं नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Back to top button