न्यूयॉर्क : सध्या सर्वत्र 'ओपन एआय'ने निर्माण केलेल्या 'चॅट जीपीटी' (Chat GPT) ची चर्चा आहे. हे माध्यम असे आहे की, तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीवरून ते आपल्याला उत्तर देते. आता 'चॅट जीपीटी'ने सोडवलेल्या किंवा तो अभ्यास करत असलेल्या अनेक केस स्टडीजही समोर येत आहेत. एका व्यक्तीने दावा केला आहे की, चॅट जीपीटीमुळे त्याच्या आजारी कुत्र्याचा जीव वाचला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीने चॅट जीपीटीची (Chat GPT) मदत घेतली आणि त्याने दिलेल्या सूचनांनुसार उपचार केले असता, त्या व्यक्तीचा कुत्रा बरा झाला. या व्यक्तीने चॅट जीपीटीचे उत्तरही सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्या व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांच्या सॅसी नावाच्या कुत्र्याला टिक-बोर्न विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यावर पशुवैद्याने उपचार सुरू केले. कुत्र्याला मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आला होता; मात्र उपचार सुरू झाल्यामुळे त्याची प्रकृती काही प्रमाणात सुधारत होती. मात्र पुन्हा काही दिवसांनी त्याची तब्येत बिघडली.
वापरकर्त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या कुत्र्याच्या हिरड्या खूप पिवळ्या आल्या होत्या. त्यामुळे तो पुन्हा आपल्या कुत्र्याला पशुवैद्याकडे घेऊन गेला. त्यानंतर त्याची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच त्यासोबत अनेक चाचण्या करण्यात आल्या, पण काही ठोस निदान मिळाले नाही. कुत्र्याची प्रकृती बिघडत चालली होती. मात्र त्यामागचे कारण सापडत नव्हते. आम्ही कुत्र्याला दुसर्या दवाखान्यात नेले. तसेच आम्ही 'चॅट जीपीटी-4'वर (Chat GPT) कुत्र्याच्या आजाराबद्दल लिहिले आणि त्यावर, काय उपचार करावेत? असा प्रश्न विचारला.चॅट जीपीटीने दिलेल्या उत्तरामध्ये लिहिले की, मी काही पशुवैद्यक तर नाही आहे; पण काही गोष्टी मी सांगू शकतो. यानंतर जे काही झाले, तो एक चमत्कारच म्हणावा लागेल.
चॅट जीपीटीने सुचवले, अॅनिमियामुळे कुत्र्याला अनेक रोग एकाच वेळी झाले आहेत. यावर काय करू शकतो, असे जीपीटीला विचारले असता, त्याने भली मोठी यादी दिली आणि उपायांबद्दल सांगितले. 'चॅट जीपीटी'ने यासाठी काही उपचार सुचवले, ज्यात अल्ट्रासाऊंडचा समावेश होता. यानंतर त्या व्यक्तीने सर्व गोष्टींचे प्रिंटआऊट घेतले आणि डॉक्टरांकडे जाऊन हे उपाय करणे शक्य आहे का, असे विचारले. डॉक्टरांनी मान्य केले की, हे संभाव्य निदान असू शकते. त्यांनी त्यावर काम सुरू केले. अनेक चाचण्या केल्यावर अनेक आजारांचे निदान झाले. याचा अर्थ 'जीपीटी-4' (Chat GPT) बरोबर होता. नंतर डॉक्टरांनी त्याच पद्धतीने उपचार सुरू केले व कुत्र्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे.
हेही वाचा :