सोन्याचा डोंगर पण… | पुढारी

सोन्याचा डोंगर पण...

वॉशिंग्टन : अमेरिकन इतिहासातील सर्वात जुनी खाण आहे ‘द लॉस्ट डचमॅन’. ही खाण देशाच्या नैऋत्येस स्थित असल्याचे म्हटले जाते. अ‍ॅरिझोनामधील ‘सुपरस्टिशन’ म्हणजेच ‘अंधश्रद्धा’ नावाचा पर्वत हा सोन्याची खाण असलेले ठिकाण म्हणून ओळखला जातो. अभ्यासक बायर्ड ग्रेंजर यांच्या माहितीनुसार, सुमारे 9,000 लोक दरवर्षी लॉस्ट डचमनची खाण शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हा ‘सोन्याचा डोंगर’ शापित असल्याचीही वदंता आहे.

संशोधक अ‍ॅडॉल्फ रूथ 1931 च्या उन्हाळ्यात या भागात संशोनासाठी गेले होते. सहा महिन्यांनंतर याच भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्यांच्या कवटीत बंदुकीच्या गोळ्यांचे दोन छिद्र होते, यामुळे खाणीच्या इतिहासाविषयी कुतुहल वाढू लागले. सरकारने आता या सुपरस्टिशन पर्वतांमध्ये खाणकाम बेकायदेशीर ठरवले आहे.

दरम्यान, 30 वर्षांपूर्वी या खजिन्याची माहिती एका मोहिमेद्वारे गोळा करण्यात आली होती आणि काही लोक सोन्याच्या शोधात टेकड्यांवरही गेले होते. खजिना सापडला नसला तरी तब्बल 3 वर्षांनी खाणीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या लोकांचे मृतदेह सापडले. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे एक गूढच आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हे लोक परिसरातील उष्णतेचे बळी ठरले असावे असा अंदाज आहे.

Back to top button