मंगळावरील सूर्यकिरणांची ‘क्युरिऑसिटी’ने टिपली प्रतिमा | पुढारी

मंगळावरील सूर्यकिरणांची ‘क्युरिऑसिटी’ने टिपली प्रतिमा

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावरील सूर्यास्तावेळी त्याच्या किरणांच्या प्रतिमा टिपल्या आहेत. या लाल ग्रहावरील सूर्यकिरणांची ही आजपर्यंतची सर्वात स्पष्ट प्रतिमा आहे. ‘क्युरिऑसिटी’ने 2 फेब्रुवारीला ढगांमधून उतरत असलेल्या या किरणांची प्रतिमा टिपली आहे.

‘क्युरिऑसिटी’कडून जानेवारी ते मार्चअखेरपर्यंतच्या काळात तेथील अशा ढगांचा सर्व्हे केला जात आहे. या मोहिमेतच ही छायाचित्रे टिपण्यात आली. हा फोटो म्हणजे 28 प्रतिमांचा एक पॅनोरामा आहे. क्युरिऑसिटी रोव्हरच्या ट्विटर पेजवरूनही तो 6 मार्चला प्रसिद्ध करण्यात आला आहे.

‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या टीमने म्हटले आहे की मंगळावर प्रथमच सूर्याची किरणे इतक्या स्पष्टपणे कॅमेर्‍यात टिपण्यात आली आहेत. ढगांच्या दाटीतून निसटलेली सूर्याची अशी किरणे ‘क्रप्युस्कलर रेज’ म्हणूनही ओळखली जातात. ही किरणे सूर्योदय किंवा सूर्यास्तावेळी दिसून येतात. धूर, धूळ किंवा वातावरणातील अन्य कणांमुळे अशी किरणे विखुरली जात असतात.

Back to top button