Artificial Intelligence : आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ शोधणार चक्क एलियन्स !

Artificial Intelligence
Artificial Intelligence
Published on
Updated on

लॉस एंजिल्स: सध्याचे युग हे नॅनो टेक्नॉलॉजी, रोबो, थ्री डी प्रिंटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अनेक थक्क करणाऱ्या गोष्टीही केल्या जात आहेत. आता संशोधकांनी एलियन्स म्हणजेच पखवासीयांचा शोध घेण्याच्या कामातही ही बुद्धिमत्ता वापरण्याचे ठरवले आहे.

संशोधकांनी यापूर्वी पृथ्वीच्या जवळ असलेल्या तात्यांच्या डेटासेटचा अभ्यास करण्यासाठी 'डीप लर्निंग' (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आठ अज्ञात संकेतांचा छडा लावला. टोरांटो विद्यापीठातील एक विद्यार्थी संशोधक पीटर मा यांच्या नेतृत्वाखाली हे अध्ययन करण्यात आले. या टीममध्ये एसईटीआय इन्स्टिट्यूट, ब्रेकथ्रू लिसन आणि जगभरातील अनेक विज्ञान संस्थांमधील वैज्ञानिक समाविष्ट होते. त्यांच्या संशोधनाची माहिती 'नेचर अॅस्ट्रॉनॉमी'मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीने (Artificial Intelligence) प्रगत असलेल्या परग्रहवासीयांची अनेक वेळा कल्पना केली जात असते. अशावेळी नेहमी प्रश्न निर्माण होतो की जर ते असतीलच तर त्यांनी आतापर्यंत पृथ्वीवासीयांना का शोधले नाही? आपण आकाशगंगेच्या केवळ छोट्याशा भागाचाच शोध घेतला आहे आणि त्यामुळे आपल्यालाही शोधता आलेले नाही, असेही म्हटले जाते. तसेच सुरुवातीच्या डिजिटल कॉम्प्युटरसाठी अनेक दशकांपूर्वी विकसित केलेले अल्गोरिदम आधुनिक पेटाबाईट-स्केल डेटासेटवर लागू केल्यावर अकार्यक्षम बनू शकते. पीटर मा यांनी सांगितले की आम्ही एकूण ८२० ताऱ्यांच्या १५० टीवी डेटाच्या माध्यमातून एका डेटासेटवर संशोधन केले होते. त्यांना जुन्या तंत्रज्ञानाद्वारे २०१७ मध्ये शोधण्यात आले होते. मात्र, खन्या अर्थाने कुतूहलजनक संकेतांचा छडा लागला नाही. आता आम्ही या प्रयत्नांची व्याप्ती मौरकॅट दुर्बीण आणि त्याच्या पुढील दहा लाख ताऱ्यांपर्यंत वाढवत आहोत. त्यामधून आपल्याला 'या ब्रह्मांडात आपण एकटेच आहोत का?' या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल असे आम्हाला वाटते. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news