curd-rice : दही-भात ठरतो आरोग्यासाठी लाभदायक | पुढारी

curd-rice : दही-भात ठरतो आरोग्यासाठी लाभदायक

नवी दिल्ली : आपल्या देशात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अनेक राज्यांमध्ये दही-भात (curd-rice) आवडीने खाल्ला जात असतो. विशेषतः असा भात दक्षिण भारतात तर अधिकच लोकप्रिय आहे. चवदार आणि थंड दही-भात स्वादिष्टही असतो आणि आरोग्यासाठी लाभदायकही असतो. अनेक गृहिणी रात्रीच्या उरलेल्या भाताचाही असा पदार्थ बनवत असतात.

तज्ज्ञांच्या मते, रोज दुपारच्या जेवण्यानंतर काही प्रमाणात दही (curd-rice) खायला हवे. त्याने आपल्याला अँटिऑक्सिडंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर त्याने मानसिक आरोग्यही सुधारते आणि वजन नियंत्रित राहते. ताण जाणवत असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही- भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

तिखट खाण्याचे शौकीन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. याचे अल्कलाईन प्रभावामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे. स्नॅक्सऐवजी दही-भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राईड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल.

खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केले जाऊ शकते. दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. एका शोधाप्रमाणे दररोज 300 ग्रॅम दही खायला पाहिजे. पचनसंस्थेसाठीही दही-भात उपयुक्त ठरतो. भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतात.

हेही वाचा : 

Back to top button