पाण्याच्या टाकीला का असतात रेषा? | पुढारी

पाण्याच्या टाकीला का असतात रेषा?

नवी दिल्ली : तुम्ही पाण्याची टाकी अनेकवेळा पाहिली असेल. मात्र, ती कधीच सरळ नसते. म्हणजेच या टाकीवर रेषा बनवलेल्या असतात. हे असे का, असा प्रश्न तुम्हाला कधी तरी पडला असेल.पाण्याच्या टाकीवरील रेषा हा एक प्रकारे डिझाईनचाच भाग आहे. मात्र, हे डिझाईनसुद्धा विचारपूर्वक बनवण्यात आले आहे. या डिझाईननुसार या रेषा आतील पाणी सुरक्षित ठेवण्यास मदत करतात आणि टाकीला भक्कम बनवतात. तसेच प्रत्येक हंगामात टाकी टिकाऊ बनवण्याचे काम करतात.

अनेकदा उन्हाळ्यात प्लास्टिकच्या टाकीचा विस्तार होण्याचा धोका असतो. तथापि, त्यावेळी या रेषा टाकी मजबूत करण्यासाठी आणि तिला प्रसरण होण्यापासून रोखण्याचे कार्य करतात. जिथे जिथे या रेषा बनवल्या जातात, त्या ठिकाणांची खास गोष्ट म्हणजे टाकी आणखी भक्कम होत जाते.

जेव्हा तुम्ही टाकीला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला कळेल की, या रेषा कुठे आहेत आणि तिथे तुम्हाला पाण्याची टाकी मजबूत दिसेल. या रेषांमुळे पाण्याचा दाब सहन करण्यास मदत होते. एक प्रकारे, ते कोणत्याही निर्मितीमध्ये आधार म्हणून कार्य करते. प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये या रेषा नसतील व त्यांची रचना पूर्णपणे साधी राहिली तर ती टाकी प्रसरण पावण्याची भीती असते. कारण, प्लास्टिक इतका दाब सहन करू शकत नाही. या रेषांमुळे टाकी मजबूत दिसते आणि दीर्घकाळ टिकते.

Back to top button