ब्रिटिश वृद्ध वर्षातील तीन महिने उदासच! | पुढारी

ब्रिटिश वृद्ध वर्षातील तीन महिने उदासच!

लंडन : प्रत्येक माणसाला कधी ना कधी उदास, एकाकी वाटत असते. अशी समस्या विशेषतः पाश्चात्त्य देशांमध्ये हिवाळ्यात, हिमवृष्टीच्या काळात निर्माण होत असते. पाश्चिमात्य देशांसह भारतातही हिवाळ्यात अनेक लोक उदास राहतात. ब्रिटनमध्ये सिझनल अ‍ॅफेक्टिव्ह डिसऑर्डरबाबत ब्रिटिश वृद्धांवर झालेल्या ताज्या अध्ययनात आढळले की, ब्रिटिश वृद्ध वर्षातून सरासरी तीन महिने उदास राहतात.

महिन्यातील 8 दिवस आणि आठवड्यात एक दिवस उदास जातो. हिवाळी उदासपणाला ‘विंटर ब्लूज’ म्हटले जाते. या मोसमात लोक अलगीकरण, चिडचिड, अशक्तपणा आणि एकाकीपणासारख्या भावनांची तक्रार करतात. हिवाळ्यात उन्हाच्या उणिवेमुळे स्ट्रोटाइनिनचा स्तर घटतो आणि लोक उदासी अनुभवू लागतात. एका दुसर्‍या सर्व्हेमध्ये उघड झाले की, जानेवारी महिना सर्वाधिक उदासपूर्ण जातो. या अभ्यासात स्पष्ट झाले की, 21 टक्के लोक ऊन घेत नाहीत.

उदासीपासून मुक्ततेसाठी कमीत कमी 15 मिनिटे ऊन घेणे गरजेचे आहे. त्यासोबतच मित्र आणि कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवणे जानेवारी ब्लूजचा सामना करण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे. सर्वेक्षणानुसार 14 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना सिझनल अ‍ॅफेक्टिव्ह डिसऑर्डर आहे. 28 टक्के लोकांना तसे वाटते. एज ऑफ लाईटचे संचालक डॉ. शेली जेम्स म्हणाले, सकाळी ऊन खाल्याने सहज झोप येऊन उदासीही दूर होते.

Back to top button