Mystery Spot : ‘इथे’ काम करीत नाही गुरुत्वाकर्षण! | पुढारी

Mystery Spot : ‘इथे’ काम करीत नाही गुरुत्वाकर्षण!

गुरुत्वाकर्षण ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या सौरमंडळात सूर्य आणि अन्य ग्रहांना बांधून ठेवते. तसेच पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्तीच आपल्याला तिच्या पृष्ठभागाशी बांधून ठेवत असते किंवा जमिनीकडे खेचत असते. आपण अधिक झुकू लागलो तर आपण खाली पडू; पण पृथ्वीवरच अशी काही ठिकाणे आहेत जिथे गुरुत्वाकर्षण (Mystery Spot)  शक्ती पूर्णपणे काम करीत नाही. तिथे तुम्ही काही अंशात झुकला तरी खाली कोसळत नाही. अशाच काही ठिकाणांची ही माहिती…

मिस्ट्री स्पॉट, कॅलिफोर्निया

अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या सांताक्रूजमधील या ‘मिस्ट्री स्पॉट’चा शोध सन 1939 मध्ये सर्वेक्षणकर्त्यांच्या एका समूहाने लावला. 1940 मध्ये जॉर्ज प्राथेर यांनी हे ठिकाण सर्वसामान्यांसाठी खुले केले. याठिकाणी चुंबकीय क्षेत्रात काही वेगळ्या प्रकारची अनियमितता आहे. ही अनियमितता सुमारे 150 चौरस फुटांच्या गोलाकार क्षेत्रात अनुभवता येते. या क्षेत्राला ‘मिस्ट्री स्पॉट’ (Mystery Spot) असे म्हटले जाते. याठिकाणी अनेक विचित्र गोष्टी अनुभवता येतात. त्यामध्ये पाणी वरच्या दिशेने वाहणे, मॅग्नेटिक कम्पास विचित्र पद्धतीने काम करू लागणे, लोकांच्या आणि वस्तूंच्या आकारात बदल होणे तसेच इथे आपण न पडता एका कोनात उभेही राहू शकतो!

सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट

अमेरिकेत 1950 च्या दशकात काही लोक मिशिगनमधील या ठिकाणी सर्व्हे करीत असताना अचानक त्यांच्या उपकरणांनी एके ठिकाणी काम करणे बंद केले. त्यांनी या जागेचे अधिक कुतुहलाने निरीक्षण (Mystery Spot) केल्यावर त्यांना आढळले की सुमारे 300 चौरस फुटांच्या क्षेत्रातच असे घडत आहे. असे म्हटले जाते की या जागेत येण्यास पशुपक्षीही कचरत असत. याठिकाणी लोक अनेक कसरती करून दाखवू शकतात व त्या येथील कमजोर गुरुत्वाकर्षणामुळे शक्य होतात. भिंतीवर खुर्ची दोन पायांवर ठेवून त्यावर बसण्यासारखे प्रकारही अनेक लोक करतात!

कॉस्मोस मिस्ट्री एरिया फ

अमेरिकेतीलच रॅपिड सिटीतील हे ठिकाणही कमजोर गुरुत्वाकर्षणामुळे लोकांच्या कुतुहलाचा विषय बनलेले आहे. याठिकाणीही लोक खाली न पडता झुकू शकतात. येथील वृक्षही विशिष्ट कोणात झुकलेले आहेत. याठिकाणी गेल्यावर केसही उभे राहू शकतात. ब्लॅक हिल्स नावाच्या टेकड्यांमधील हे ठिकाण (Mystery Spot) नेहमीच कुतुहलाचा विषय बनलेले आहे. 1952 मध्ये दोन मुलांनी या ठिकाणाचा शोध लावला होता.

हेही वाचा : 

Back to top button