Hydrogen car : फ्युएल इग्नॉस्टिक सिस्टीमद्वारे हायड्रोजनवरही धावतील मोटारी! | पुढारी

Hydrogen car : फ्युएल इग्नॉस्टिक सिस्टीमद्वारे हायड्रोजनवरही धावतील मोटारी!

नवी दिल्ली : सध्या जीवाश्म इंधनाला शोधून ‘क्लीन एनर्जी’च्या सहाय्याने वाहने तसेच अन्य उपकरणे चालवण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. भारतातील ऑटोमोबाईल उद्योगातही सध्या परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नवी दिल्लीत आयोजित ऑटो एक्स्पोमध्ये कंपन्यांनी ग्राहकांना इलेक्ट्रिकल व्हेईकल (ईव्ही) व्यतिरिक्त इंधनाचे इतर स्वस्त व आधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. फ्युएल इग्नॉस्टिक सिस्टीमद्वारे हायड्रोजनवर (Hydrogen car) धावणार्‍याही मोटारी भविष्यात पाहायला मिळू शकतात.

काही कंपन्यांनी नवीन इंजिन सिस्टीम प्रदर्शनात मांडली. त्यास पेट्रोल-डिझेलच्या वाहनात फिट करून चालवण्यासाठी हायड्रोजन, बायोडिझेल, इथेनॉल, सीएनजी आणि एलएनजीपैकी (Hydrogen car) कोणताही पर्याय निवडता येऊ शकेल. एक्स्पोमध्ये इंजिनाशी संबंधित पर्यायी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले.

प्रॉडक्शन मॉडेल म्हणून डझनावर बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल मांडण्यात आले आहेत. (Hydrogen car) प्रदर्शनात 800 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. एकाच वाहनात डिझेल, हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीसारख्या इंधनांचाही वापर होऊ शकेल. कोलंबस कंपनीने ‘फ्यूएल एग्नॉस्टिक इंजिन सिस्टीम’च्या निर्मितीच्या अनोख्या तंत्रज्ञानाची घोषणा केली. हे तंत्रज्ञान मल्टिपल फ्यूएल इंजिनचे असून ते हायड्रोजन, बायो-डिझेल, इथेनॉल, सीएनजी, एलएनजी व इतर इंधनावर आधारित आहे.

हेही वाचा : 

Back to top button