rich dog : कुत्र्याची संपत्ती 4 हजार कोटी; हेवा वाटेल अशा ऐषोरामात राहताे | पुढारी

rich dog : कुत्र्याची संपत्ती 4 हजार कोटी; हेवा वाटेल अशा ऐषोरामात राहताे

रोम : ‘हर कुत्ते का एक दिन आता है’ असे म्हटले जाते. मात्र, जगाच्या पाठीवर एक कुत्रा (rich dog) असा आहे ज्याचे वर्षातील सर्वच दिवस त्याचेच आहेत असे म्हणावे लागेल! याचे कारण म्हणजे हा कुत्रा तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. विशेष म्हणजे त्याला ही संपत्ती आजोबांपासून वारशाने मिळालेली आहे!

या श्वानाचे नाव आहे ‘गुंथर-4’ त्याची मालकी इटलीतील मीडिया कंपनी ‘गुंथर कार्पोरेशन’कडे आहे. राजेशाही थाटात जगणार्‍या या श्वानाचा आजोबा ‘गुंथर-3’ नावाचा श्वान जर्मनीची कौंटेस कॅर्लोट्टा लिबेन्स्टेन यांचा आवडीचा पाळीव प्राणी होता. उमराव घराण्यातील या श्रीमंत महिलेचे 1992 मध्ये निधन झाले. त्यावेळी तिने आपल्या या लाडक्या कुत्र्यासाठी (rich dog) 8 कोटी डॉलर्सची संपत्ती मागे ठेवली असल्याचे स्पष्ट झाले. आता ही संपत्तीच गुंथर कार्पोरेशनने 50 कोटी डॉलर्सपर्यंत नेली आहे. ‘गुंथर-3’ चा नातू असलेला हा ‘गुंथर-4’ सध्या कुणालाही हेवा वाटेल अशा ऐषोरामात राहत आहे. त्याच्यासाठी अनेक सुखसुविधा व सुरक्षेची साधने आहेत.

हेही वाचा : 

Back to top button