दक्षिण आफ्रिकेत सापडला दोन डोक्यांचा साप | पुढारी

दक्षिण आफ्रिकेत सापडला दोन डोक्यांचा साप

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेत डर्बनमध्ये एका व्यक्तीला आपल्या बगिच्यात दोन डोक्यांचा साप दिसला. त्याने तत्काळ त्याची माहिती सर्पमित्र असलेल्या निक इवान्स याला दिली. इवान्सने तिथे या ब्राऊन एग ईटर स्नेक प्रजातीच्या सापाला पाहिले आणि त्यालाही आश्चर्य वाटले. हा दोन डोक्यांचा साप असल्याने त्याचेही कुतुहल वाढले.

इवान्सने सांगितले की या सापाला कुणी त्रास देऊ नये म्हणून मी त्याला पकडून बाटलीत ठेवले. ज्याच्या बगिच्यात हा साप सापडला त्यानेही या सापाला सुरक्षितपणे घेऊन जाण्यास सांगितले. हा केवळ 30 सेंटीमीटर लांबीचा साप होता व विचित्र पद्धतीने चालत होता. त्याची दोन्ही डोकी विपरित दिशेत पुढे सरकत असत तसेच वळल्यावर दोन्ही डोकी एकमेकांजवळ येत असत.

माझ्या माहितीप्रमाणे असे साप जास्त दिवस जिवंत राहू शकत नाहीत. जंगलात तर ते काहीच दिवसांचे पाहुणे असतात. याचे कारण म्हणजे त्यांना नीट चालताही येत नाही. त्यांची गती अतिशय धीमी असते. त्यामुळे मी त्याला जंगलात सोडू शकत नाही तर हा साप आमच्याच देखरेखीखाली राहील. दोन डोक्यांचे असे काही जीव पाहायला मिळत असतात. गर्भाशयात किंवा अंड्यात दोन भ्रूण एकमेकांच्या शरीरात वाढले की असे प्रकार होत असतात.

Back to top button