Telescope : सर्वात मोठा सोलर टेलिस्कोप समूह | पुढारी

Telescope : सर्वात मोठा सोलर टेलिस्कोप समूह

बीजिंग : अंतराळ संशोधन क्षेत्रात अमेरिकेला मागे टाकण्यासाठी स्पर्धा करीत असलेल्या चीनने आता धगधगणार्‍या सूर्याच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची तयारी केली आहे. त्यासाठी चीनने जगातील सर्वात मोठा सोलर टेलिस्कोप (Telescope) समूह बनवला आहे. हे टेलिस्कोप 3.14 किलोमीटरच्या वर्तुळात बसवण्यात आले आहेत. हा समूह बनवण्यासाठी चीनने 313 डिशचा वापर केला आहे. त्यांच्या माध्यमातून सूर्यावरील घडामोडींमुळे पृथ्वीवर कोणते परिणाम होतात हे पाहिले जाईल. याशिवाय संपूर्ण ब्रह्मांडावरही नजर ठेवण्याची क्षमता यामुळे चीनला मिळेल.

‘द दाओचेंग सोलर रेडियो टेलिस्कोप’ला चीनने आपल्या नैऋत्य प्रांत सिचुआनमध्ये स्थापन केले आहे. यामधील प्रत्येक 313 डिशपैकी प्रत्येकाची रुंदी 19.7 फूट आहे. अशा डिश वर्तुळाकार स्थितीत लावण्यात आल्या असून हे वर्तुळ 3.14 किलोमीटरमध्ये आहे. या टेलिस्कोपच्या (Telescope) सहाय्याने सौर वादळे आणि कोरोनल मास इलेक्शनवर नजर ठेवली जाऊ शकेल. या घडामोडींमुळेच पृथ्वीवरील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि सॅटेलाईटस्वर विपरित परिणाम होतो.

कोरोनल मास इजेक्शन किंवा ‘सीएमई’ सूर्याच्या पृष्ठभागावरून (Telescope) बाहेर पडणार्‍या काही भयानक स्फोटांपैकी एक असतात. यामधून अंतराळात ताशी अनेक दशलक्ष मैल वेगाने एक अब्ज टनापर्यंतचे पदार्थ बाहेर पडू शकतात. जर हे पदार्थ किंवा कण पृथ्वीकडे आले तर त्यामुळे पॉवर ग्रीड, टेलिकम्युनिकेशन, अंतराळात फिरत असलेले सॅटेलाईटस् आणि अंतराळवीरांच्या सुरक्षेवरही विपरित परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : 

Back to top button