Elon Musk : एलन मस्क यांच्या टेबलवर असतात ‘या’ वस्तू! | पुढारी

Elon Musk : एलन मस्क यांच्या टेबलवर असतात ‘या’ वस्तू!

वॉशिंग्टन : ‘टेस्ला’, ‘स्पेस एक्स’ आणि आता ‘ट्विटर’चे सर्वेसर्वा असलेल्या (Elon Musk) एलन मस्क यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत बेडरूममधील काही फोटो सर्वांसमोर आणले आहेत. यामध्ये मस्क यांच्या बेडशेजारी असणार्‍या टेबलवर नेमक्या कोणत्या गोष्टी असतात, यावरून पडदा उठला आहे. सर्वसामान्यांच्या बेडशेजारी लॅम्प, पुस्तके, मोबाईल किंवा काही औषधे असतात; पण मस्क सर्वांहून वेगळेच म्हणावे लागतील. याचे कारण, त्यांच्या बेडशेजारी चक्क रिव्हॉल्व्हर, शीतपेयाचे काही टीन, पाण्याची बाटली अशा काही गोष्टी दिसत आहेत.

एलन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या सोयीनुसार ठेवलेल्या या गोष्टी त्यांना गाढ झोप देत असाव्यात असेच नेटकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो पाहताना अनेक नेटकरी असेही होते ज्यांनी मस्कच्या मानसिकतेवर आणि त्याच्या वृत्तीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून मस्क यांनी ट्विटरमध्ये केलेले बदल पाहता त्यांनी अनेकांचा रोष ओढावून घेतला आहे.

तिथे एक वाद शमत नाही, तोच दुसरीकडे इंटरनल बगच्या माध्यमातून कमीत कमी 5.4 मिलियन ट्विटर युजर्सची माहिती हॅकर फोरमवर ऑनलाईन लीक झाली. (Elon Musk) ऑनलाईन विक्रीसाठी 5.4 दशलक्ष जणांची माहिती आणि त्या व्यतिरिक्तही एका वेगळ्या ट्विटर अ‍ॅप प्रोग्रामिंग इंटरफेसच्या मदतीने 1.4 मिलियन ट्विटर प्रोफाईल काहीजणांमध्ये खासगी पातळीवर शेअर करण्यात आले. (Elon Musk) यामध्ये खासगी दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आणि इतर काही माहितीचा समावेश आहे.

Back to top button