आता येणार काचेसारखा 'पारदर्शक स्‍मार्टफोन' 'या' कंपनीने लाँच केला देखील.. | पुढारी

आता येणार काचेसारखा 'पारदर्शक स्‍मार्टफोन' 'या' कंपनीने लाँच केला देखील..

लंडन : आतापर्यंत आपण फोल्डेबल आणि रोलेबल डिस्प्लेसह स्मार्टफोनचे डिझाईन पाहिले आहे. अशातच, यावर्षी नथिंग कंपनीने पारदर्शक बॅक पॅनलसह स्मार्टफोन लाँच केला आहे. हा युनिक स्मार्टफोन म्हटला जातोय. असे स्मार्टफोन भविष्यातही येऊ शकतात, ज्याच्या माध्यमातून आपण सर्व आरपार पाहू शकतो. अशाप्रकारे भविष्यातील स्मार्टफोनचा कॉन्सेप्ट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

पारदर्शक बॉडी असलेल्या या स्मार्टफोनच्या व्हिडीओमध्ये फोनच्या बॅटरीसह हार्डवेअरचे भाग दिसणार नाहीत. या स्मार्टफोनची बॉडी काचेसारखी पारदर्शक आहे, ज्यातून एखाद्या आरशाप्रमाणे पाहता येईल. साहजिकच या अनोख्या फोनबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

यामध्ये पारदर्शक वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात येणार आहे. हा एक अँड्रॉईड फोन आहे, ज्यामध्ये गुगल प्ले स्टोअरचा आयकॉन दिसू शकतो. तसेच, नोटिफिकेशन पॅनेलदेखील दिसणार आहे. मात्र, हा भविष्यातील फोन कोणता स्मार्टफोन ब्रँड बनवणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Back to top button