चिमुरड्याने आईन्स्टाईन-हॉकिंगनाही टाकले मागे! | पुढारी

चिमुरड्याने आईन्स्टाईन-हॉकिंगनाही टाकले मागे!

लंडन : ब्रिटनमधील अकरा वर्षांच्या एका मुलाने जगातील सर्वात मोठे ‘जिनियस’ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे. युसूफ शाह नावाच्या या मुलाने मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये तब्बल 162 गुण मिळवले. आईन्स्टाईन आणि हॉकिंग यांचा आयक्यू म्हणजेच बुद्ध्यांक 160 च्या आसपास होता असे मानले जाते.

लीडस्मध्ये सहाव्या इयत्तेत शिकत असलेल्या युसूफने सांगितले, शाळेत सर्वांना वाटते की तो बराच स्मार्ट आहे. त्याने व त्याच्या आई-वडिलांनी ठरवले होते की हायस्कूलसाठी अर्ज करण्याची तयारी करीत असतानाच मेन्सा परीक्षेचीही तयारी करायची. त्याचे वडील रफान शाह यांनी सांगितले की ही एक कठीण परीक्षा आहे. मात्र, त्याने ती सहजपणे दिली. परीक्षेच्या एका भागात त्याला सांगण्यात आले होते की त्याच्याकडे तीन मिनिटांत उत्तरे देण्यासाठी 15 प्रश्न आहेत. त्याने तीन मिनिटांऐवजी ‘तेरा मिनिटे’ असे चुकून ऐकले होते आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपला वेळ घेतला. मात्र, तरीही त्याने चांगली कामगिरी करून दाखवली हे विशेष!

Back to top button