मंगळावर मिळाले महाकाय समुद्र असल्याचे पुरावे | पुढारी

मंगळावर मिळाले महाकाय समुद्र असल्याचे पुरावे

वॉशिंग्टन : बर्‍याच वर्षांपासून मंगळ ग्रहावर महाकाय समुद्र होता की नाही, याबाबत संशोधकांमध्ये अनेक वर्षांपासून वादविवाद सुरू आहेत. आता संशोधकांना मंगळ ग्रहावर एक प्राचीन समुद्र असल्याचे पुरावे मिळाले आहेत. भौगौलिक आकडेवारीच्या आधारावर मंगळ ग्रहावर 3.5 अब्ज वर्षांपूर्वी तटरेषा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तटरेषा सुमारे 900 मीटर खोल आणि हजारो वर्ग किलोमीटर परिसरात पसरली होती. या शोधामुळे मंगळ ग्रहावर मानवी जीवन असल्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे.

संशोधकांनी एका नकाशाचा वापर केला आणि मंगळ ग्रहाच्या उत्तरेला एक समुद्र असल्याचे पुरावे मिळवले आहेत. ग्रहावर कधीकाळी समुद्राचा जलस्तर वाढला होता आणि हा समुद्र गरम आणि कमी उष्ण काळात अस्तित्वात होता. सध्या मंगळावरील वातावरण खूपच बिघडले असून तेथील जमीन पृथ्वीपेक्षा खूपच वेगळी आहे.

मंगळावर समुद्र असल्याचे आम्हाला पुरावे मिळाल्यानंतर त्याठिकाणी मानवी जीवन असल्याच्या शक्यतेला अधिक दुजोरा मिळाला असल्याचा दावा संशोधक बेंजामिन कार्डेनिस यांनी केला आहे. ते म्हणाले, आम्हाला प्राचीन जलवायू आणि त्याच्या विकासाची माहिती होती. याच आधारावर मंगळावर असा एक काळ होता की त्यावेळी मंगळ खूपच गरम होता.

मंगळावर संशोधकांना 6 हजार 500 किलोमीटर लांबीच्या नदीच्या परिसराचाही शोध लावला आहे. मंगळवारील तटरेषेला एईओलिस डोर्सा असे म्हटले जाते. ग्रहावर अनेक नद्या असल्याचे पुरावे मिळाले असून या परिसरात समुद्राचा जलस्तर खूपच मोठा होता, असा दावा संशोधकांनी केला आहे.

Back to top button