एकाच इमारतीत अख्खे शहर | पुढारी

एकाच इमारतीत अख्खे शहर

अलास्का : जगभरात अनेक गोष्टी आर्श्चकारक करायला लावणार्‍या असतात. मानवी कल्पनेतून नवनवीन गोष्टी नेहमीच आकाराला येत असतात. पृथ्वीवरील अशीच एक मानवी संकल्पनेने साकारलेले शहर अमेरिकेतील अलास्कामध्ये आहे.

तेथे एक रहस्यमय शहर केवळ 14 मजली इमारतीत वसले आहे. चर्च, पोस्ट ऑफिस आणि पोलिस स्टेशन हे सर्व या छोट्या इमारतीत आहे. या शहरात 272 लोक राहतात. या दुर्गम शहराचे नाव व्हिटियर आहे.

बेगीच टॉवर असे या इमारतीचे नाव आहे. शहरात शाळा, चर्च, बाजार, दवाखाना या सर्व सुविधा या इमारतीत आहेत. थेट रस्ता नसल्याने व्हर्टिकल टाऊनपर्यंत रस्त्याने पोहोचणे सोपे नाही. डोंगरावरील बोगदे आणि अवघड रस्त्यांवरूनच तेथे पोहोचता येते. तेथे जाण्यासाठी सागरी मार्गाचा वापर करता येतो. शीतयुद्धाच्या काळात ही इमारत लष्कराची बॅरेक होती; पण नंतर येथे सामान्य नागरिक राहू लागले. या इमारतीत राहणार्‍या लोकांची जीवनशैलीही इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. या भागातील हवामान बहुतेक वेळा खराब राहते, त्यामुळे येथील लोकांना कुठेही जाणे अशक्य असल्याचे सांगितले जाते.

Back to top button