पृथ्वीजवळून वेगाने उद्या जाणार लघुग्रह | पुढारी

पृथ्वीजवळून वेगाने उद्या जाणार लघुग्रह

कॅलिफोर्निया : पृथ्वीच्या अगदी जवळून एक महाकाय लघुग्रह प्रचंड वेगाने जाणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार या लघुग्रहाची लांबी जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘बुर्ज खलीफा’ इतकी आहे. या लघुग्रहाचे नाव ‘2022 आरएम 4’ असे आहे. हा लघुग्रह एक नोव्हेंबर रोजी पृथ्वीजवळून जाणार आहे.

नासाच्या ‘सेंटर फॉर नियर अर्थ स्टडिज’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार या लघुग्रहाचा व्यास अंदाजे 330 ते 740 मीटर अथवा 2400 फूट इतका असू शकतो. खगोल शास्त्रज्ञांच्या मते, हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असे सांगण्यात येत असले तरी ज्यावेळी तो पृथ्वीच्या अगदी जवळ येईल, त्यावेळी या दोहोंमधील अंतर 1.5 ते 2.5 मिलियन किमी इतके असेल.

लघुग्रह हा तार्‍याच्या एक तुकडाच असतो आणि तो सूर्याच्या चारही बाजूने समकक्षेत फिरत असतो. ‘लाईव्ह सायन्स’ने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘2022 आरएम 4’ हा लघुग्रह पृथ्वीजवळून ताशी

52,500 मैल इतक्या प्रचंड वेगाने निघून जाणार आहे. कोणतीही अवकाशीय वस्तू पृथ्वीच्या 120 मिलियन मैल इतक्या अंतरापर्यंत पोहोचते, अशा वस्तूंना ‘पृथ्वीजवळून जाणारी खगोलीय वस्तू’ म्हणून ओळखली जातेे. दरम्यान, 12 सप्टेंबर 2022 रोजी हवाईतील हलीकाला येथे उभारण्यात आलेल्या ‘पॅन-स्टारआरएस 2’ टेलिस्कोपच्या मदतीने खगोल शास्त्रज्ञांनी ‘2022 आरएम 4’ या लघुग्रहाला शोधले होते. याचा समावेश पृथ्वीसाठी धोकादायक लघुग्रहांच्या यादीत करण्यात आला आहे.

Back to top button