दुःखी असाल, तर येईल लवकर वृद्धत्व | पुढारी

दुःखी असाल, तर येईल लवकर वृद्धत्व

वेलिंग्टन : आपणा सर्वांना माहीत आहे की, तणाव अथवा दुःख हे आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार दुःख, त्रास, एकाकीपणा, एकाग्रतेचा अभाव, अस्वस्थता, निराशा आणि भीती यासारख्या समस्यांमुळे लवकर वृद्ध होण्याचा धोका निर्माण होतो.

जगभरात सध्या एक नव्या प्रकारच्या घड्याळ्याचा वापर करण्यात येत आहे. या घड्याळ्याच्या मदतीने खरे व जैविक अथवा बायोलॉजिकल वयाचा अचूक अंदाज बांधला जाऊ शकतो. यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनानुसार आपल्या जीवनावर मानसिक अस्वस्थेचा आणि अनेक शारीरिक आजार तसेच धूम्रपान असा आजारांचा मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही समाधानी नसाल आणि जास्त दुःखी असाल, तर याचा परिणाम शरीरावर वाईट सवयींपेक्षाही जास्त होऊ शकतो.

एखाद्याचे जैविक वय निश्चितपणे माहीत असेल, तर त्याच्या मदतीने संबंधित व्यक्ती किती युवा अथवा वृद्ध आहे, याचे अचूक निदान करणे शक्य होते. हा अंदाज अचूक असेल, तर एखाद्याचे वय दुसर्‍या व्यक्तीच्या तुलनेत वेगाने का वाढत आहे, याचा शोध शास्त्रज्ञ लावू शकतात. वेगाने वाढत असलेल्या वयावर कोणत्या कारणांचा परिणाम होत आहे?

2021 मध्ये न्यूझीलंडमध्ये 23 लाख लोकांवर संशोधन करण्यात आले. यामध्ये मानसिक आजार, शारीरिक आजारांची सुरुवात आणि मृत्यू यांच्यात अगदी जवळचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले.

Back to top button