ऑनलाईन वस्तूंचा बॉक्स तपकिरी रंगाचाच का असतो? | पुढारी

ऑनलाईन वस्तूंचा बॉक्स तपकिरी रंगाचाच का असतो?

नवी दिल्ली : तुम्ही कधी विचार केलाय का की ऑनलाईन वस्तू मागवल्यावर ती ज्या बॉक्स पॅकिंगमधून येते तो बॉक्स ब—ाऊन रंगाचाच म्हणजे तपकिरीच का असतो? तो सफेद किंवा निळा, हिरवा अशा रंगात का येत नाही?

खरंतर हे पार्सल ज्या कुरिअर बॉक्समधून येते, तो डिलिव्हरी बॉक्स कार्डबोर्डचे किंवा पुठ्ठ्याचे बनलेले असतात, जो संपूर्ण कॉर्पस कागदाचा बनलेला आहे. आता तुम्हाला हे माहित असेल की नैसर्गिकरीत्या आपल्याला झाडापासून कागद मिळते आणि ते कागद ब्लिच केलेले नाहीत, म्हणूनच ते तपकिरी रंगाचे आहेत. तपकिरी हा कागदाचा नैसर्गिक रंग आहे. कागद नैसर्गिकरीत्या तपकिरी असतो कारण तो झाडाच्या लाकडापासून, देठापासून आणि सालापासून बनवला जातो. त्यानंतर सफेद कागदासाठी आपण त्याला नैसर्गिक ब्लिच करतो जेणेकरून त्यावर सहज लिहिता येईल; पण आपल्याला पुठ्ठ्यावर काहीही लिहावे लागत नाही, त्यामुळे त्यावर ब्लिचिंग आवश्यक नसते.

तसेच ब्लिचिंग प्रोसेस महागडी असल्यामुळे कागद पांढरे करण्यासाठी जास्त पैसे खर्च होतात. ज्यामुळे कमीत कमी पैशात विक्रीच्या वस्तूंचे बॉक्स बनवले जातात. कंपन्या या कार्डबोर्डच्या ब्लिचिंगवर पैसे खर्च करत नाहीत आणि कमीत कमी पैशात बॉक्स विकत घेऊन किंवा बनवून ते आपल्यापर्यंत पोहोचवतात.

Back to top button