अवघ्या वीस सेकंदांच्या व्हिडीओने गमावली नोकरी! | पुढारी

अवघ्या वीस सेकंदांच्या व्हिडीओने गमावली नोकरी!

वॉशिंग्टन : अनेकांना व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियात शेअर करण्याची घाई लागलेली असते. अशावेळी आपण काय करतो आहोत याचेही अनेकांना भान नसते. जगभर टिक-टॉक व्हिडीओ आणि रील्समुळे अनेकजण अडचणीतही आले आहेत. आता अमेरिकेतील एका महिलेला अवघ्या वीस सेकंदांच्या व्हिडीओमुळे लाखो रुपयांचे वेतन असलेली नोकरी गमवावी लागली आहे.

या 24 वर्षीय महिलेचाहे की ती साप्ताहिक ऑनलाइन मीटिंगमध्ये भाग घेत होती. यादरम्यान तिने कॅमेरा बंद केला होता; पण माईक चालू होता. यादरम्यान मिशेलकडून कॉफी खाली पडली. त्याचा टिक-टॉक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला. कार्यालयातील सहकार्‍यांचा आवाजही व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला आहे, याची पर्वा तिने केली नाही.

सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केल्याच्या 24 तासांच्या आत, एचआर आणि मुख्य उत्पादन अधिकार्‍याने सांगितले की गंभीर निष्काळजीपणासाठी तिला ताबडतोब काढून टाकण्यात आले. आता मिशेलने आणखी एक टिक-टॉक व्हिडीओ अपलोड करून या घटनेची माहिती दिली आहे. मिशेलने सांगितले की, ती झेन टेक नावाच्या कंपनीत काम करत होती. तिला लाखोंचा पगार मिळायचा; पण आता तिला टिक टॉक व्हिडीओ पोस्ट केल्याबद्दल काढून टाकण्यात आले आहे.

Back to top button