वेदनादायक आठवणी विसरण्यासाठी संगीत थेरपी | पुढारी

वेदनादायक आठवणी विसरण्यासाठी संगीत थेरपी

न्यूयॉर्क ः आठवणींच्या अडगळीतील एखादी गंजलेली टाचणी कधी बोचेल हे काही सांगता येत नाही. अशा आठवणी मेंदूतून ‘डिलिट’ करता येतील का असे अनेकांना वाटत असते. आता यावरही संगीतकला लाभदायक ठरते असे संशोधकांनी म्हटले आहे. वेदनादायी आठवणी असलेल्या मेंदूच्या भागावर संगीतोपचाराचा परिणाम दिसून येतो. संगणकातील फाईल डिलिट करण्यासाठी क्लिनिंग अ‍ॅपचा वापर करावा तसे काम म्युझिक थेरपी करते. न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे.

आतापर्यंत शब्द किंवा घटना लक्षात ठेवण्यासाठी संगीत प्रभावी मानले जात होते. परंतु, संगीताचा वापर वाईट अनुभव पुसण्यासाठीही करता येऊ शकतो. झोपतेवेळी संगीत ऐकल्यावर 50 टक्के शब्द आपण विसरून जातो. हे शब्द आपल्या मेंदूत वारंवार घुमतात. त्यामुळे शब्दाची एक जोडी एकाच वेळी आठवू शकत नाहीत. प्रकल्पात सहभागी 29 जणांना संगणकावर शब्दांच्या जोड्या दिसत होत्या. त्यापैकी एक शब्द म्हणजे सायकल होय. दुसर्‍या जोडलेल्या शब्दात कार्यालय किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव समाविष्ट होते. लोकांना सायकल लक्षात राहिली. परंतु व्यक्तीचे नाव, ठिकाण लक्षात राहिले नाही.

पूर्वीच्या संशोधनानुसार संगीत ऐकल्यानंतर स्मरणशक्ती वाढते आणि तो शब्दही आठवतो, असा दावा करण्यात आला होता. डॉ. एडन हॉर्नर म्हणाले, झोपेत असताना विशिष्ट गोष्टी विसरण्यासाठी प्रेरित केले जाते. या प्रयोगाच्या निष्कर्षात गत अध्ययनांचेही समर्थन केले आहे. झोपतेवेळी वेगवेगळ्या 60 घटकांचे श्रवण झोपतेवेळी वेगवेगळे शब्दासंबंधी 60 वर घटक दाखवण्यात आले होते. सहभागींना वस्तूसंंबंधी मोठ्या आवाजात बोलतानाही अनेकांनी पाहिले. त्यापैकी काही झोपेत गेले. अर्थात या मुद्द्यावर अद्यापही आणखी संशोधनाची गरज आहे.

Back to top button