पृथ्वीसारख्या मंगळावर वितळत नाहीत हिमनद्या | पुढारी

पृथ्वीसारख्या मंगळावर वितळत नाहीत हिमनद्या

न्यूयॉर्क : पृथ्वीसारखेच मंगळावरही ग्लेशियर्स (हिमनद्या) आहेत; पण ते वितळत नाहीत. पृथ्वीवरील ग्लेशियर वितळण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘जलवायू परिवर्तन’ आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ होय; पण मंगळावर असे बिल्कूल होत नाही; पण तेथे बर्फाचे पर्वत उभे असतील, असेही नाही.

पृथ्वीवरील ग्लेशियर वितळतात, त्यावेळी पाणी उतरतीच्या दिशेने वाहत असते. याचे प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. कधी कधी ग्लेशियर्स वेगाने वितळल्याने कधी कधी हिमस्खलनही होत असते. पृथ्वीप्रमाणे मंगळावरही मोठ्या प्रमाणात ग्लेशियर्स आहेत. मात्र, ते सुकलेले आहेत. त्यामध्ये अत्यंत कमी ओलावा आहे. तसेच मंगळावरील गुरुत्वाकर्षण शक्ती अत्यंत कमी आहे. यामुळे सूर्याच्या उष्णतेनेे ग्लेशियर जरी वितळले तरी खाली पाणी वाहू शकत नाही. याशिवाय कमी गुरुत्वाकर्षणामुळे ग्लेशियर तुटून खाली पडत नाहीत; पण तेथे चिकटून राहतात.

मात्र, यासंदर्भात फ्रान्सच्या ‘नॉनटेस युनिव्हर्सिटी’तील प्लॅनेटरी सायंटिस्ट एना राऊ गालोफ्रे यांनी सांगितले की, मंगळावर असलेले ग्लेशियर्सही सध्या वितळू लागले आहेत. मात्र, त्याचा वेग अत्यंत कमी आहे. म्हणजेच मंगळावर ग्लेशियरची निर्मिती वेगाने होत असली तरी त्यांची धूप मात्र अत्यंत संथपणे होत असते. मंगळावर चढ-उतार हे ग्लेशियरच्या वितळल्यामुळेच तयार झाले आहेत. कारण लाल ग्रहावर एकेकाळी मोठ्या प्रमाणात पाणी होते; पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. एना आणि त्यांच्या पथकाने मंगळावरील ग्लेशियरचे मॉडेल तयार करून त्याचा अभ्यास करून वरील निष्कर्ष काढले आहेत.

Back to top button