हिमयुग म्हणजे नेमके काय? | पुढारी

हिमयुग म्हणजे नेमके काय?

नवी दिल्ली : पृथ्वीच्या तसेच जीवसृष्टीच्याही इतिहासातील पाषाणयुग, ताम्रयुग, कांस्ययुग, लोहयुग अशा नावाच्या युगांची माहिती आपण वाचत असतो. त्याबरोबरच हवामानाशी संबंधित हिमयुग व त्या काळातील मॅमथसारखे हत्ती याबाबतही आपण वाचत असतो. पृथ्वीच्या इतिहासात असे हवामान बदलाचे अनेक कालखंड आले होते. या बदलांमध्ये हिमयुग हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र, या हिमयुगाविषयी लोकांना अधिक माहिती नसते.

हिमयुगाची व्याख्या करणे हे सोपे नाही. यामध्ये उत्तर व दक्षिण गोलार्धांमध्ये महाद्विपीय बर्फाच्या चादरी तयार होतात आणि हिमनद्यांपासून अँडीज, रॉकी अशा सर्व पर्वतरांगांना हिमाच्छादित करतात. हिमयुगाच्या व्याख्येमध्ये वेळ किंवा काळ हा एकमेव प्रमुख घटक आहे ज्यामुळे हिमयुगाचा कालावधी मोजला जाऊ शकतो. भूगर्भीय बदलांवरूनही त्याचे मोजमाप केले जाऊ शकते. हिमयुगात देखील संपूर्ण कालावधीत थंड आणि गरम कालावधी असतात.

हिमयुगाच्या थंड कालावधीला ‘स्टॅडियल’ तर ऊबदार कालावधींना ‘इंटर-स्टॅडियल’ असे म्हणतात. ज्यावेळी पृथ्वी इतकी उष्ण होते की साचलेले बर्फ कमी होते किंवा पूर्णपणे नाहीसे होते त्यावेळी हिमयुगाचा अंत झाला असे समजले जाते. हिमयुगात आजच्या रशियाचे टुंड्रा क्षेत्र हे एक उत्तम उदाहरण आहे. अशा वातावरणांना ‘पेरिग्लेशियल’ म्हणतात आणि ते कायमचे बर्फाळ मैदान आणि ऊबदार बर्फ मुक्त क्षेत्रांमध्ये आढळतात. पृथ्वीवर आलेल्या हिमयुगांचा विशिष्ट कालावधी होता. 2.4-2.1 अब्ज, 715-55 दशलक्ष, 45-420 दशलक्ष, 36-260 दशलक्ष वर्षांपूर्वी हिमयुग होते. तेराव्या ते अठराव्या शतकातील काळाला लहान हिमयुग म्हटले जाते.

Back to top button