सर्वात सुरक्षित घर! | पुढारी

सर्वात सुरक्षित घर!

न्यूयॉर्क : जगात एक घर असे आहे ज्याला आपण ‘सर्वात सुरक्षित घर’ म्हणू शकतो. या घरात एकेकाळी अमेरिकेची पहिली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे ठेवण्यात आली होती. हे घर ‘अ‍ॅटलास-एफ’ क्षेपणास्त्र संकुल अण्वस्त्रांच्या हल्ल्याला तोंड देऊ शकते. हे घर प्रॉपर्टी मार्केटमध्ये 4 कोटी 30 लाख रुपयांहून अधिक किमतीला विकले जात आहे. अर्थात हे घर जमिनीवर दिसतच नाही तर ते एक बंकर आहे!

हे घर 1962 मध्ये बांधण्यात आले होते. कोणत्याही अणुहल्ल्यासही तोंड देऊ शकणारे हे घर सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. अमेरिकेतील नेब्रास्कामधील यॉर्क इथे बांधण्यात आलेल्या या बंकर हाऊसमध्ये एकूण दोन मजले आहेत. हे घर 1256 चौरस फूट क्षेत्रात बांधले गेले आहे. या घरात एक बेडरूम व एक बाथरूम असून ते जमिनीखाली 174 फूट खोलीवर आहे.

घराला नऊ फूट जाडीचे छत आहे. खाली उतरून घरात प्रवेश करताच पहिल्या मजल्यावर किचन, बाथरूम आणि बेडरूम आहे. याठिकाणी विजेचेही कनेक्शन आहे आणि गरम तसेच थंड पाणी उपलब्ध आहे. पाणी साठवण्यासाठी खोलीच्या मध्यभागी 500 गॅलनची टाकी आहे. या घरात एक बोगदाही आहे.

Back to top button