लोकांना झोपेतून उठवून मिळवतो लाखो रुपये! | पुढारी

लोकांना झोपेतून उठवून मिळवतो लाखो रुपये!

लंडन : लहान मुलांना झोपेतून उठवून त्यांना शाळेसाठी तयार करणे ही प्रत्येक आई-बापासाठी रोजची कसरतच असते. अर्थात प्रौढांनाही झोपेतून उठवणे ही काही सोपी गोष्ट नाही. जुन्या जमान्यात भुपाळ्या गाऊन राजाला उठवले जात असे. हल्ली कर्णकर्कश अलार्म लावून उठण्याची वेळ आली आहे. सकाळच्या साखरझोपेवर त्यामुळे अक्षरशः मीठ पडते! मात्र अशा साखरझोपेच्या वेळीच स्वतः उठून इतरांना उठवण्याचे काम करून लाखोंची कमाई करणाराही एक माणूस या पृथ्वीतलावर आहे.

जॅकी बोहेम असे या व्यक्तीचे नाव आहे. बोहेमच्या मते, तो लोकांना उठायला सांगून महिन्याला 26 लाख रुपये कमावतो. तो त्याच्या बेडरूममध्येच असतो व तेथूनच तो लोकांना उठायला सांगतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास बोहेम त्याच्या अलार्ममधून पैसे कमावतो. अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी जॅकीने ही भन्नाट कल्पना अंमलात आणली व ती यशस्वीही झाली. आता तो लाखो रुपये कमावत आहे. त्याने आपले बेडरूम हे लेझर, स्पीकर, बबल मशिन आणि अन्य उपकरणांनी भरले आहे. या सर्व गोष्टी सहजपणे एखाद्याच्या झोपेत व्यत्यय आणू शकतात.

या इंटरॅक्टिव्ह लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून लोक बोहेमच्या बेडरूममध्ये ठेवलेली उपकरणे नियंत्रित करू शकतात. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. बोहेम त्याच्या फॉलोअर्सना उठवण्याच्या बदल्यात पैसे घेतो. थोडक्यात तो लोकांना झोपेतून उठवण्यासाठी इंटरअ‍ॅक्टिव्ह लाईव्ह स्ट्रिमिंगचा वापर करतो आणि विविध आवाजांमुळे त्याला पैसे देणारे ग्राहक झोपेतून जागे होतात! फॉलोअर्स अलार्मसाठी त्यांच्या आवडीचे कोणतेही गाणं निवडू शकतात आणि ते या रूममधील त्रासदायक प्रकाशाचा शो किंवा अन्य गोष्टींसह क्लब करू शकतात. त्याच्याकडे वीसहून अधिक साऊंड इफेक्टस् आहेत!

Back to top button