29 व्या वर्षांपूर्वीच पडले दात; आता 36 लाखांचा खर्च | पुढारी

29 व्या वर्षांपूर्वीच पडले दात; आता 36 लाखांचा खर्च

लंडन : दात हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव. तो खराब झाल्यास संबंधिताच्या खाण्यावर परिणाम होतो. खराब जीवनशैली, विविध व्यसने आणि निगा न राखल्याने दातासंबंधीच्या समस्या बळावतात. खराब झालेले दात दुरुस्त करणे हा एकच पर्याय उरतो. मात्र, काहीवेळा ते काढूनही टाकावे लागतात. यासंबंधीचीच एक खळबळजनक घटना इंग्लंडमध्ये घडली आहे.

इंग्लंडच्या ब्रिस्टल येथे राहणार्‍या एका तरुणाचे अवघ्या 29 वर्षे वयापूर्वीच सर्वच्या सर्व दात पडले. अ‍ॅलेक्झांडर स्टोईलोव असे त्याचे नाव आहे. सर्वच्या सर्व दात पडल्याने त्याला काहीच खाता येत नाही. यामुळे त्याला लिक्विडवरच भर द्यावा लागतो. जर नवे दात बसवून घ्यावयाचे असल्यास सुमारे 36 लाख (40 हजार पाऊंड) खर्च करावे लागतील. उल्लेखनीय म्हणजे स्टोईलोवचे सर्व दात खाताना पडले.

अ‍ॅलेक्झांडर सध्या 35 वर्षे वयाचा आहे. म्हणजे सर्व दात पडून सहा वर्षे झाली. यासंदर्भात बोलताना त्याने सांगितले की, लहानपणी मला अँटिबायोटिक देण्यात आले. त्याचा साईड इफेक्ट म्हणून दात कमकुवत बनत गेले व पडू लागले. सध्या माझ्या तोंडात एकही दात शिल्लक नाही. डॉक्टरांच्या मते, नवे दात बसवण्यासाठी हिरड्याही काढावे लागतील. जर असे केले तर जबड्यांच्या हाडात इन्फेक्शन होण्याची भीती आहे. यामुळे सध्या माझ्यासमोर समस्याच समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

Back to top button