मुलींच्या तुलनेत मुलं समाजाशी अधिक फटकून | पुढारी

मुलींच्या तुलनेत मुलं समाजाशी अधिक फटकून

न्यूयॉर्क : मुलींच्या तुलनेत मुलं एकाकीपणाने अधिक घेरलेली असतात. ते समाजापासून अधिक फटकून असतात. वयाबरोबर हे सामाजिक अंतर आणखी वाढत जाते. वय वाढेल तसे सामाजिक परिघ वाढतो; पण त्याच्याशी भावनिक बंध कमी होत जातात, असे आढळून आले आहे. ‘जर्नल ऑफ हेल्थ अँड सोशल चिहेवियर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.

याबाबतच्या संशोधनात असे दिसून आले की मुली व महिला या मुलं व प्रौढ पुरुषांच्या तुलनेत अधिक सामाजिक वृत्तीच्या असतात. अविवाहित किंवा नाते तुटल्यानंतर एकटे राहणार्‍या लोकांवर याचा असमानरितीने प्रभाव पडतो. तसेच महिला-पुरुष अशा दोघांनाही किशोरावस्थेच्या तुलनेत नंतरच्या जीवनात सामाजिक वेगळेपणाचा स्तर वाढत जातो. डेबरा अंबरसन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

त्यांनी सांगितले की सामाजिक अलगता मानसिक स्तरावर त्रास देते आणि शारीरिक आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. यामुळे अगदी मृत्यूचा धोकाही वाढत असतो. याबाबत अमेरिकेतील 12,885 महिला आणि 9,271 पुरुषांवर पाहणी करण्यात आली. संशोधकांना आढळले की पुरुष आणि महिलांमध्ये 18 ते 42 वर्षे वयापर्यंत अशा वेगळेपणाची स्थिती जवळजवळ सारखीच असते. मात्र, वृद्धत्व येईपर्यंत महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात वेगळ्या पडत जातात.

Back to top button