
पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जगासाठी ऐतिहासिक दिवस आहे. (NASA DART Mission) त्याला खास कारण आहे. नुकतचं काही तासांपुर्वी सकाळी ४ वाजून ४५ वाजता अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) एक इतिहास रचला आहे. आता पृथ्वीला लघुग्रहापासुन बचाव करता येणार आहे. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या संभाव्य धोका ठरू शकणाऱ्या लघुग्रहांचा मार्ग बदलण्यासाठीची चाचणी आज नासाने केली. लघुग्रहाची दिशा आणि वेग बदलवणारी ही चाचणी यशस्वीरित्या पुर्ण झाली.
आपल्या पृथ्वीला लघुग्रहाच्या धोक्यापासून वाचवण्याच्या अभ्यासाअंतर्गत नासाने डार्ट मिशन (DART Mission- Double Asteroid Redirection Test ) हाती घेतलं होतं. या मोहिमेअंतर्गत लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलण्याचं काम करण्यात येणार होतं. ही मोहीम आज सकाळी यशस्वीरीत्या पुर्ण झाली आहे. या चाचणीमुळे जर भविष्यात लघुग्रहाच कोणतंही संकट पृथ्वीवर आल्यास त्याचा सामना करता येणार आहे. नासाचा अंतराळातील हा मोठा प्रयोग होता. अंतराळयान प्रति तास २२ हजार ५०० किमी वेगाने लघुग्रहावर आदळले.