
लिमा : दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात पुरातत्त्व संशोधकांनी एका प्राचीन मकबर्याचा शोध लावला आहे. याठिकाणी सात मानवी अवशेष सापडले आहेत. हा मकबरा इसवी सन 500 ते 1000 या काळातील असावा असा अंदाज आहे. याठिकाणी संशोधकांना सोन्या-चांदीच्या वस्तू आढळून आल्या आहेत.
1300 वर्षांपूर्वी शुद्ध सोने-चांदी कसे होते हे या उत्खननातून दिसून आले. तिथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसमवेतच तांब्याची हत्यारे, सुर्या-कुर्हाडी, कपड्यांचे अवशेष, लाकडी साहित्य, कातडी वस्तूही आढळल्या आहेत. या मकबर्यापासून काही अंतरावरच 2012 मध्येही एक मोठा मकबरा सापडला होता. तिथे तीन उच्चवर्गीय महिलांचे अवशेष सापडले होते. या महिला वारी साम्राज्यातील राण्यांचे असावेत असा कयास आहे. इसवी सन 500 ते 1000 या काळात वारी साम्राज्य तेथील पर्वतीय भागात अस्तित्वात होते.
समुद्र किनार्यालगतच्या भागातही त्यांची सत्ता होती. या साम्राज्याची ओळख त्या काळातील कलाकुसरीसाठीही आहे. सोन्या-चांदीच्या भांड्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्व ठिकाणी त्यांची कलेची आवड दिसून येते. इतिहासकारांच्या मते, इसवी सन 1200 नंतर या साम्राज्याचा पूर्णपणे र्हास झाला.