नर समुद्री घोडे देतात पिल्‍लांना जन्म!

नर समुद्री घोडे देतात पिल्‍लांना जन्म!

Published on

सिडनी : निसर्गात काही अनोखे जीव पाहायला मिळतात. गांडूळ हा उभयलिंगी जीव असून तो नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारे कार्य करतो. काही मादी प्राणी नराच्या संपर्काशिवायच मादी पिल्‍लांना जन्म देत असतात. समुद्री घोडा आणि पाइपफिश या जलचरांच्या अशा दोन प्रजाती आहेत ज्यामध्ये नर गर्भधारणा करतो आणि पिल्‍लांना जन्म देतो.

नर समुद्री घोडे आपल्या वाढत असलेल्या भ्रूणांना शेपटीला जोडलेल्या पिशवीत मोठे करतात. ही थैली सस्तन प्राण्यांमधील माद्यांच्या गर्भाशयासारखीच असते. त्यामध्ये एक नाळ असते जी विकसित होणार्‍या भ्रूणांना जोडलेली असते. नर समुद्री घोडा आपल्या पिल्‍लांना या नाळेतून पोषक घटक व ऑक्सिजन पुरवतो. आता नव्या संशोधनातून दिसून आले आहे की नर समुद्री घोडे प्रसूतीच्या वेदना सहन करण्यासाठी आपल्या अनोख्या शरीर संरचनेचा खुबीने वापर करतात.

जन्म देणे ही एक जटिल जैविक प्रक्रिया आहे जी मादी गर्भवती प्राण्यांमध्ये ऑक्सिटोसिनसहित हार्मोनद्वारे नियंत्रित होते. सस्तन प्राणी व सरीसृपांमध्ये ऑक्सिटोसिन गर्भाशयाच्या गुळगुळीत व ओलसर स्नायूंना संकुचनासाठी उत्तेजन देते. सिडनी विद्यापीठ आणि न्यूकॅसल विद्यापीठाच्या संशोधकांच्या एका टीमने नर समुद्री घोड्यांमध्ये प्रसूती वेदना कशा होतात हे पाहिले. शोधाच्या अनुवंशिक डेटाने समजले होते की सस्तन प्राण्यांमधील माद्यांमध्ये होणार्‍या प्रसूती वेदनासारखीच ही प्रक्रिया असू शकते.

1970 मधील एका संशोधनावेळीही असे दिसून आले होते की गर्भधारणा न केलेल्या नर समुद्री घोड्यांना ज्यावेळी ऑक्सिटोसिनच्या संपर्कात आणल्यावर त्यांनी प्रसव वेदनेसारखे वर्तन केले. त्यामुळे संशोधकांनी म्हटले होते की नर समुद्री घोडे ब्रूड पाऊचमधील गुळगुळीत स्नायूंना आकुंचित करून जन्म देण्याच्या प्रक्रियेला नियंत्रित करण्यासाठी ऑक्सिटोसिन हार्मोनचाच वापर करतात. वास्तवात असे दिसून आले की प्रसूतीदरम्यान नर समुद्री घोडे आपल्या शरीराला शेपटीकडे झुकवतात, दाबतात आणि पुन्हा आराम करतात. या प्रक्रियेदरम्यान, संपूर्ण शरीरात एका झटक्याबरोबर थैलीचे मुख उघडले जाते आणि हळूहळू शेकडो नवजात समुद्री घोडे पाण्यात बाहेर पडतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news