‘नासा’ उद्या पाठवणार ‘मेगारॉकेट’ | पुढारी

‘नासा’ उद्या पाठवणार ‘मेगारॉकेट’

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ सोमवारी (दि.29 ऑगस्ट) आपल्या पहिल्या स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) मिशन आर्टेमिस-1 ला सुदूर अंतराळात पाठवण्याची तयारी करीत आहे. हे मेगारॉकेट पृथ्वीवर परत येण्यापूर्वी चंद्राभोवती एका लांब कक्षेत भ्रमण करील. भारतीय वेळेनुसार सोमवारी सायंकाळी सहा वाजता फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या लाँच पॅड ‘39 बी’ वरून त्याचे प्रक्षेपण होईल.

‘आर्टेमिस1’ ही एक मानवरहीत अंतराळ मोहीम आहे. यामध्ये दोन तासांचा लाँच विंडो आहे जो 29 ऑगस्टला सायंकाळी उघडेल. आर्टेमिस-1 चंद्रावर आणि त्याच्या चारही बाजूंनी निरंतर दीर्घकालिक उपस्थितीची पायाभरणी करील. ‘नासा’ने म्हटले आहे की ‘एसएलएस रॉकेट’ आणि एकीकृत ओरियन अंतराळयान भविष्यातील मोहिमेत अंतराळवीर कोणता अनुभव घेऊ शकतात हे दाखवेल.

Back to top button