ढग बनवणारा अनोखा डोंगर! | पुढारी

ढग बनवणारा अनोखा डोंगर!

माद्रिद : निसर्ग अनेक वेळा अनोखी द़ृश्ये दाखवत असतो व ही द़ृश्ये पाहून ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तिथे कर माझे जुळती’ असे म्हणून माणूस केवळ नमस्कारच करू शकतो! असेच एक द़ृश्य दक्षिण स्पेन आणि मोरोक्कोदरम्यानच्या जिब्राल्टर शहरात पाहायला मिळते. तिथे विमानतळाजवळच असलेल्या डोंगरावरील हिरवळीला धडकणार्‍या हवेने आकाशात ढग निर्माण होतात.

हे ठिकाण ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या डोंगरामुळेच प्रसिद्ध आहे. स्पेनजवळील हे ठिकाण ब्रिटनच्या मालकीचे आहे. या उंच शिळेसारख्या दिसणार्‍या डोंगराच्या पायथ्याने टूमदार शहर वसलेले असून तेथील लोकसंख्या 32 हजार आहे. या शहरातील हा डोंगर व त्यावर तयार होणारे ढग पर्यटकांना आकर्षित करतात. डोंगराने जणू काही ढगांची शालच पांघरली असावी असे द़ृश्य याठिकाणी दिसते. भूमध्य सागरातून उष्ण हवा ओलसरपणा आणते त्यावेळी असे ढग तयार होतात. डोंगराच्या पलीकडे हवा आग्नेय दिशेकडे वाहते. अशावेळी येथील कोरडे हवामान हवेचा वेग कमी करते. परिणामी, तीव्र हवेचा वेग डोंगराला धडकत असल्याने ओलसरपणा गडद थराच्या रूपात ढग तयार करतात. जिब्राल्टर शहर अनेक बाबतीत महत्त्वाचे आहे. याच ठिकाणी भूमध्य समुद्र अटलांटिक महासागराशी जोडला जातो.

Back to top button