दोन बाह्य ग्रह वर आहेत महासागर आणि हायड्रोजन | पुढारी

दोन बाह्य ग्रह वर आहेत महासागर आणि हायड्रोजन

लंडन : आपले ब्रह्मांड हे असंख्य रहस्यांनी भरलेले आहे. एकीकडे एलियन असल्याची चर्चा होते, तर दुसरीकडे खगोलशास्त्रज्ञ दुसर्‍या ग्रहांवरील संभाव्य जीवनाचे संकेत शोधत आहेत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून खगोलशास्त्रज्ञांनी ‘वॉटरवर्ल्ड’ असलेल्या दोन बाह्य ग्रह यांचा शोध लावला आहे. उल्लेखनीय म्हणजे, हे ग्रह अत्यंत उष्ण असून, तेथे समुद्र आणि हायड्रोजनही मोठ्या प्रमाणात आहे. या स्थितीत तेथे जीवन असू शकते.

केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधक पथकाने या ग्रहांना ‘हाईसिन’ असे नाव दिले आहे. संशोधकांच्या मते, या दोन बाह्य ग्रह वर एलियन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शास्त्रज्ञांनी सध्या अशा ग्रहांवर लक्ष केंद्रित केले आहे की, ज्यांचा आकार, द्रव्यमान, तापमान आणि वातावरणीय संरचना पृथ्वीसारखी आहे. खगोलशास्त्रज्ञांनुसार या बाह्य ग्रहांचे वातावरण हायड्रोजनने तयार झाले आहे.

याबरोबरच तेथे समुद्र उष्णता आणि चांगले वातावरण असल्याने ते पृथ्वीसारखेच राहण्यायोग्य आहेत. याशिवाय हे ग्रह टेलिस्कोपच्या मदतीने सहजपणे पाहता येऊ शकतात. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, आपल्या सूर्यमालेबाहेरील जीवनाचा शोध येत्या दोन ते तीन वर्षांत लागू शकतो.

केंब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे निक्कू मधुसुदन यांनी म्हटले की, या शोधामुळे ब्रह्मांडातील जीवनाचा शोध घेण्याचा एक मार्ग खुला झाला आहे. हाईसीन ग्रहांमधील काही ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे आणि त्यांचे तापमानही जास्त असू शकते. याशिवाय तेथे महासागरही असू शकतात.

Back to top button