‘या’ ठिकाणी चक्क झोपण्याची नोकरी; महिन्याला लठ्ठ पगारही मिळतो! | पुढारी

'या' ठिकाणी चक्क झोपण्याची नोकरी; महिन्याला लठ्ठ पगारही मिळतो!

लंडन ः ऑफिसमध्ये जाऊन कुणी डुलक्या काढत असेल तर त्याविरुद्ध सक्त कारवाई होणे हे साहजिकच आहे. मात्र, झोप घेण्यासाठीच जर एखादी कंपनी तुम्हाला गलेलठ्ठ पगार देत असेल तर? अमेरिकेतील एका कंपनीने अशी नोकरी दिलेली आहे. कर्मचार्‍याला ऑफिसमध्ये जाताच झोपण्यासाठी एक सुंदर मॅट्रेस (गादी) दिली जाते आणि कर्मचार्‍याला झोपेचा पोशाख परिधान करून त्यावर मस्त ताणून द्यायचे असते! झोप झाल्यावर कर्मचार्‍याला घरी परत जायचे असते. या कामाबद्दल त्याला महिन्याला लठ्ठ पगारही मिळतो!

ज्या कंपनीने हा जॉब दिलेला आहे तिचे नाव ‘कॅस्पर’ असे आहे. ही कंपनी मॅट्रेस बनवण्याचे काम करते. आपण बनवलेल्या गादीचा दर्जा कसा आहे, लोकांच्या झोपेवर तिचा कसा परिणाम होतो हे कंपनी तपासून घेत असते. त्यामुळे अशा गादीवर झोपून तिच्या दर्जाबाबत निष्कर्ष सांगणारा कर्मचारी कंपनीला हवाच असतो. या कामासाठी कंपनी अशा व्यक्तीला निवडते ज्याला भरपूर झोप येते. विशेषतः पडल्या पडल्या झोपणार्‍या लोकांसाठी तर ही नोकरी आदर्श आहे. अशा कर्मचार्‍याला झोपण्यासाठी रोज एक नवी गादी दिली जाते. अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचा कुणीही माणूस अशी नोकरी करू शकतो.

Back to top button